नांदेड,(प्रतिनिधी)- बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी हत्या प्रकरणात कट रचणारे दोन आरोपी वाढले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनि ईम्बीसात देशमुख यांनी दोघांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
संजय बियाणी हत्या प्रकरणात त्यांच्या हत्या कटात सामील असलेल्या 7 गुन्हेगारांना पोलीसांनी पकडल्या नंतर न्यायालयाने त्या 7 जणांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
आज तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी कृष्णा घोंडीबा पवार (28) रा. आमदुरा नांदेड आणि हरीष मनोज बाहेती (28) रा.मारवाडगल्ली वजीराबाद नांदेड यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. आता संजय बियाणी हत्या प्रकरणात आरोपींची संख्या 9 झाली आहे.
संबधीत बातमी..
https://vastavnewslive.com/2022/06/02/संजय-बियाणी-हत्याकांडात/