कराड (दि.5, प्रतिनिधी) -वेणूताई चव्हाण कॉलेज कराड, राष्ट्रीय सेवा योजना (वरिष्ठ विभाग), ग्रामपंचायत, वडोली निळेश्वर व सामाजिक वनीकरण विभाग, कराड व पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक, 5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मौजे वडोली निळेश्वर, ता. कराड येथील एकवीरादेवी मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री सुमित गवते (वनरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, कराड), श्री विक्रम निकम (वनरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग पाटण), व श्री नेताजी तांबे (वनपाल, सामाजिक वनीकरण विभाग, कराड) यांनी वृक्षसंवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. आर. ए. केंगार, वनरक्षक श्री सुमित गवते, श्री विक्रम निकम, सौ. मानसी निकम, वनपाल श्री नेताजी तांबे, श्री विकास मोहिते, वडोली निळेश्वरचे सरपंच श्री भीमराव मदने, उपसरपंच सौ. सविता पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. अंजना पवार, सौ. अर्चना वाघमारे, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.पी. पवार, प्रा. सौ. एस. पी. पाटील, प्रा. एस. एस. बोंगाळे, प्रा. पी. एस. कराडे आदींच्या शुभहस्ते वड, पिंपळ, चिंच, आंबा, जांभूळ, उंबर, इत्यादी वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी वडोली निळेश्वर येथील सन्माननीय ग्रामस्थ श्री बापूसाहेब पवार, स्वातंत्र्यसैनिक श्री शंकर दादा पवार, श्री संभाजी पवार, श्री अशोक पवार, श्री प्रदीप पवार, श्री अक्षय पवार, श्री भिमराव सपकाळ, श्री सुरज वाघमारे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री ढमाले, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाधिकारी प्रा.आर. पी. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. सौ. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सर्व उपस्थितांचे महाविद्यालयाच्या वतीने प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी आभार व्यक्त केले.