नांदेड(प्रतिनिधी)-14 हजारांची लाच स्विकारल्यारल्यानंतर पकडल्या गेलेला नांदेड ग्रामीणचा पोलीस अंमलदार शिवाजी पाटील आणि पोलीसांचा खाजगी सेवक अशा दोन जणांना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी तीन दिवस अर्थात 10 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.6 जून रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील (35) आणि पोलीसांचा खाजगी सेवक मारोती गोविंदराव कवळे या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नवा मोंढा मैदानात ताब्यात घेतले होते. शिवाजी पाटील याने मारोती कवळेच्या मार्फतीने 14 हजाराची लाच स्विकारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील तक्रारदाराकडून शिवाजी पाटीलने 7 हजारांची लाच फोन पेद्वारे अगोदरच स्विकारलेली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडल्यानंतर अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या अंगझडतीत 2 लाख 25 हजार रुपये वेगळे सापडले. ते पैसे सुध्दा सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहेत.
आज दि.7 जून रोजी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी अशोक इपर आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पोलीस अंमलदार शिवाजी पाटील आणि त्यांचा सेवक मारोती कवळे या दोघांना विशेष न्यायालयाच्या समोर हजर केले. सापडलेल्या सर्व रक्कमेसाठी आणि इतर तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी शिवाजी पाटील आणि मारोती कवळेला तीन दिवस अर्थात 10 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.
पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड आता नियंत्रण कक्षात जाणार काय?
एखाद्या पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार लाच घेतांना पकडला गेला तर त्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्याची नि युक्ती नियंत्रण कक्षात करण्यात यावी असे एक परिपत्रक सन 2020 मध्ये पोलीस महासंचालकांनी काढले होते. त्यानंतर सन 2021 मध्ये नांदेड जिल्ह्यातील ईस्लापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना पकडले होते. त्यानंतर नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी त्यावेळचे ईस्लापूर येथील ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत किनगे यांना त्वरीत प्रभावाने नियंत्रण कक्षात बोलावून घेतले होते. त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी त्यांना भाग्यनगर पोलीस ठाणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार लाच स्विकारल्यानंतर पकडण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगझडतीत 2 लाख 25 हजार रुपये सापडले आहेत. मग त्यांच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना सुध्दा नियंत्रण कक्षात बोलावले जाणार काय? या प्रश्नाचे उत्तर उद्या कळेल काय ?
संबधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/06/07/अबब-नांदेड-ग्रामीण-पोलीस/