नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल)- नांदेडच्या एका वकिलाने आम्ही न्यायालयात व्यक्तीगत कामासाठी उभे असताना चोरून त्याचे फोटो काढले आणि इतरांना सांगून आमचे ते न्यायालयातील फोटो व्हायरल करायला लावले. स्वत: पण व्हायरल केले. त्यात आमची एक जुनी बातमी जोडली. ज्यामुळे अनेकांना नवीन संभ्रम तयार झाला आणि आम्हाला विचारणा झाली. काही व्हॉट्सऍप गु्रपवर काहींनी कॉमेंट्स पण केल्या. आमच्या बातमीला जोडून आमची बदनामी करण्याचा झालेला प्रयत्न असा आहे की, आभाळासमोर तोंड करून थुंकल्यानंतर तो थुंका थुंकणाऱ्याच्या तोंडावरच पडतो आणि असेच या नांदेडमधील दुसऱ्या पिढीतील स्वत:ला प्रसिद्ध विधीज्ञ समजणाऱ्या ऍड. मनिष शर्मा (खांडील) यांचे झाले.
आम्ही जेवढ्या बातम्या लिहितो, त्या सर्व बातम्या आम्ही आमच्या फेसबुकवर प्रसारीत करीत असतो. ही आमची दैनंदिन सवय आहे. दि. 7 जून 2022 रोजी आम्ही न्यायालयात एका व्यक्तीगत कामासाठी थांबलो असताना नांदेडचे ऍड. मनिष खांडील यांनी वकिली सोडून पत्रकारिता करत मार्च महिन्यातील आमच्या एका बातमीची लिंक व्हॉट्सऍप संकेतस्थळावर प्रसारीत केली आणि त्यात आमचा फोटो सुद्धा जोडला. त्यामुळे बातमीच्या लिंकवर आमचे नाव पाहून अनेकांनी आम्हाला विचारणा केली. त्याचे उत्तर तर आम्ही दिलेच, पण आमची बदनामी करण्याचा प्रयत्न ऍड. मनिष खांडील यांनी केला. कारण आमच्या मार्च महिन्याच्या बातमीसोबत आमचे 7 जूनचे फोटो जोडले. मागील 30 वर्षांपासून आम्ही अखंडपणे आमची कलम झिजवत आहोत. त्या बातमीतील संदर्भ लिहिताना ऍड. मनिष खांडीलने एका ग्रुपवर लिहिले आहे की, अगोदर बातमी लिहिली आणि आता आम्ही त्यांची मदत करत आहोत. ऍड. मनिष खांडीलने लक्षात ठेवायला हवे आमच्या मुलावर सन 2014 मध्ये असाच एक खोटा गुन्हा दाखल झाला होता. इतर पत्रकारांंपैंकी काही जणांनी आमचा मुलगा आहे म्हणून त्या बातमीला प्रसिद्धी दिली नव्हती. पण आम्ही स्वत: आमच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची बातमी छापली होती, हे बहुदा दुसऱ्या पिढीतील अतिविद्वान ऍड. मनिष खांडील यांना माहित नाही. त्यानंतर माझ्या मुलाची त्या खोट्या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर आम्ही फिर्यादीचा घेतलेला शब्दांच्या प्रभावातील सूड सुद्धा ऍड. मनिष खांडील यांना माहित नाही. ऍड. मनिष खांडील आमच्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत, याची जाण आम्हाला 7 जून रोजी झाली.
बातमी लिहिणे हा प्रकार वेगळा आहे, तसेच मदत करणे हा प्रकार वेगळा आहे. ऍड. मनिष खांडीलने ज्या स्वत:च्या अर्थाने आमचे फोटो व्हॉट्सऍप संकेतस्थळावर प्रसारीत करून आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कधी स्वत:चे आत्मपरीक्षण केले नाही. ज्या लोकांची आम्ही मदत करत आहोत ती काही ना काही कारणाने आमची आहेतच. आज तर त्यांना आम्ही आमच्या मुलांची जागा दिली आहे. कोण्या तरी भडव्याच्या प्रयत्नामुळे यातील एक मुलगा मनोरूग्ण अवस्थेकडे जात होता. त्यावर गुन्हा दाखल करायला लावला गेला. त्याच्या बातम्या प्रसारीत करण्यात आल्या. असंख्य बातम्या प्रसारीत झाल्यानंतर आम्ही वास्तव न्यूज लाईव्हमध्ये त्या बातमीला प्रसिद्धी दिली. त्यानंतर ती मुले आमच्याकडे आली आणि त्यांनी या सर्व कटकारस्थानामध्ये ऍड. मनिष खांडीलचा हात असल्याचे सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना तुम्हाला मदत करू असे वचन दिले.
ऍड. मनिष खांडीलने केलेले प्रयत्न तर रावणाने सुद्धा केले नव्हते, अशी ही मुले सांगतात. आम्ही बातमी लिहिल्यानंतर आमचे फोटो प्रसारित करताना अगोदर बातमी लिहिली आणि नंतर मदत करत आहेत, असा आमच्याविरूद्ध शब्दप्रयोग केला. जगात कोणत्याही शब्दकोषामध्ये बातमी लिहिणे आणि मदत करणे यांचा कोठेही जोड नाही. दोन वेगवेगळ्या बाबी आहेत आणि त्यावर निर्णय घ्यायचा अधिकार प्रत्येक व्यक्तीचा आहे. तंत्रज्ञान कायदा काय असतो, त्याचा उपयोग कसा केला जातो, त्याचा दुरूपयोग कसा केला जातो या सर्व बाबींची माहिती आम्हाला पण आहे. पण आम्ही असे काही करणार नाही. कारण, रस्त्यावरून मदमस्त पद्धतीने चालणाऱ्या हत्तीला पाहून अनेक कुत्रे भुंकतात पण त्या भुंकण्याचा प्रभाव त्या हत्तीवर काही होत नाही, हे सुद्धा तेवढेच खरे आहे. ज्या बालकांना आम्ही मदत केली आहे, ते आमचे छावे आहेत. छाव्यांचा शिकार कुणी कुत्रे करू शकत नाहीत. कारण आम्ही त्यांना शिक्षणच दिले की, आपल्याविरूद्ध होणाऱ्या कटकारस्थानापासून कसे वाचावे. तेव्हा माझे छावे कोणाला भिणार नाहीत आणि वेळप्रसंगी कोणाचा नरडा घोटायला घ्यायला वेळ सुद्धा लावणार नाहीत.या बालकांच्या तीन पिढ्यानी अनेकांना मिठाई चारली त्यांनी आता त्याची गरळ ओकायला सुरुवात केली आहे.अश्यावेळी आम्ही त्यांची मदत केली तर बिघडले काय ?
