नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील बोरबन भागात कॉंग्रेस नगरसेवक प्रतिनिधीने आपल्या काही साथीदारांसह एका महिलेवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणातील सहा आरोपींना वजिराबाद पोलिसांनी पकडले. त्यांची पोलीस कोठडी आज संपली. तरी पण अद्याप कॉंग्रेस नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले मात्र पोलिसांना सापडले नाही.
शांताबाई बाबुराव वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जून रोजी रात्री 8 वाजता कॉंग्रेस नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले, अनिल गाजुला, वैभव गणपत महागडे, सुजल गणपत बहादूरे, रोहन राजू खाडे आणि एक महिला अशा 8 जणांनी हल्ला केला आणि घर रिकामे करण्यासाठी त्यांना सांगितले. हा हल्लेखोरांनी घरातील साहित्य फेकून 25 हजारांचे नुकसान केले. वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा 191/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे यांच्याकडे आहे. प्रविण आगलावे यांनी या प्रकरणातील सहा जणांना अटक केली, या सर्वांची पोलीस कोठडी आज संपली आहे. पण कॉंग्रेस नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले मात्र अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.
कॉंग्रेस नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले वजिराबाद पोलिसांना सापडेना