नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिवाजी पाटील आणि त्याचा खाजगी सेवक मारुती कवळे यास विशेष न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी काही दिवसांसाठी तुरुंगातील आनंद घेण्यास पाठवले आहे.जामीन अर्जावर सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
14 हजारांची लाच स्वीकारणारा पोलीस अंमलदार शिवाजी पाटील आणि त्याचा खाजगी सेवक मारुती कवळेला विशेष न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी आज 10 जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर जामीन मागितला होता.पण न्यायालयाने त्यांना जामीन देणे नाकारले आहे.शिवाजी पाटील आणि मारुती कवळे ची जामीन मंजूर होताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ नयेत म्हणून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे काही पोलीस अंमलदार खूप मेहनत घेत होते.पण न्यायालयाने शिवाजी पाटील आणि मारुती कवळेला आज जामीन दिला नाही.कारण जामीन देण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपले म्हणणे सादर केले होते.पण न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी जामीन सुनावणीच्या युक्तिवाद ऐकण्यास वेळ दिला नाही.अर्थात पुढील आठवड्यात तारीख देण्यात आली.शिवाजी पाटील यांच्यावतीने ऍड.अमित डोईफोडे यांनी मेहनत घेतली होती.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/06/07/नांदेड-ग्रामीणचा-लाच-स्व/