श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आता राखीव पोलीस निरिक्षक झाले

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत पारदर्शकता राखत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना नांदेड आता नांदेड जिल्ह्याची जबाबदारी देत पोलीस मुख्यालयाचा प्रभार दिला आहे. पण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही पोलीस निरिक्षक पाठविण्यात आलेला नाही.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेतीघाटांचे संरक्षक पोलीस अंमलदार शिवाजीराव गंगाधरराव पाटील (35) बकल नंबर 2929 यांना आणि त्यांचा खाजगी सेवक मारोती गोविंदराव कवळे (34) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 6 जून रोजी रात्री नवा मोंढा मैदानात 14 हजार रुपये खाजगी सेवकाच्या हस्ते स्विकारण्यासाठी जेरबंद केले. जिल्हा न्यायालयाने पाटील आणि कवळे यांना आज 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते.
पोलीस महासंचालक कार्यालयाने सन 2020 मध्ये जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार ज्या पोलीस ठाण्यातील कोणत्याही व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यवाही करेल. त्या परिस्थितीत त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्षात जमा करायचा आहे. नांदेड जिल्ह्यात यापुर्वी सुध्दा अशाच कार्यवाह्यांमध्ये कांही पोलीस अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले होते. पोलीस अंमलदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे लाचेच्या 14 हजार रुपयांसह अंग झडतीत 2 लाख 25 हजार रुपये पण सापडले होते.
इतरांना दिलेल्या वागणूकीप्रमाणेच वागत अत्यंत पारदर्शक राहत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी पारदर्शकता दाखवली. नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालयाचे प्रमुख राखीव पोलीस निरिक्षक हे सुट्टीवर आहेत. त्यांचा प्रभार त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. अशा परिस्थितीत प्रमोद शेवाळे यांनी नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना राखीव पोलीस निरिक्षक पोलीस मुख्यालय या खुर्चीवर बसण्यासाठी आदेशीत केले आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.
या संदर्भाने मागील तीन दिवसांचा ईतिहास चाळला असता नुतन राखीव पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब त्या ठिकाणी असल्याची माहिती प्राप्त झाली नाही. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात विचारणा केली असता त्या ठिकाणी सुध्दा श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब उपलब्ध नाहीत असे सांगण्यात आले. सोबतच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कोणताही नवीन पोलीस निरिक्षक पाठविण्यात आलेला नाही अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

संबंधीत…

https://vastavnewslive.com/2022/06/07/नांदेड-ग्रामीणचा-लाच-स्व/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *