नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर दोन महिन्याच्या कालखंडानंतर संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या दिराविरुध्द दिलेल्या तक्रारीनंतर त्यास अटक झाली. आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.बिहारी (जगताप) यांनी संजय बियाणी यांचे बंधू प्रविण बियाणीला तीन दिवस अर्थात 13 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
5 एप्रिल रोजी संजय बियाणी यांची हत्या झाली. या हत्त्येनंतर 5 जून 2022 रोजी संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार संजय बियाणी आणि त्यांचा भाऊ प्रविण बियाणी यांच्यात फायनान्स व्यवसायाची भागिदारी होती आणि दि.4 जून रोजी प्रविण बियाणीने आनंदनगर भागात असलेल्या कार्यालयातून एक टीबी क्षमतेची हार्डडिस्क चोरून नेली आहे. त्याबाबत विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 195/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 380 सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 43(ब) आणि 66 नुसार दाखल झाला. विमानतळ पोलीसांनी काल दि.9 जून रोजी या प्रकरणातील आरोपी, मयत संजय बियाणी यांचे भाऊ प्रविण बालाप्रसाद बियाणी (45) यांना अटक केली. अटक केल्यानंतर हा गुन्हा तपासासाठी नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला.
आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर, पोलीस अंमलदार दिलीप जाधव, बालाजी पवार, नागनाथ यांनी अटक करण्यात आलेले संजय बियाणीचे बंधू प्रविण बियाणी यांना न्यायालयात हजर केले. तसेच या गुन्ह्याच्या तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.एम.बिरहारी (जगताप) यांनी प्रविण बालाप्रसाद बियाणी यांना तीन दिवस अर्थात 13 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे.
संबधित..
https://vastavnewslive.com/2022/06/06/संजय-बियाणीच्या-हत्ये-नं/