संजय बियाणी हत्याकांडातील 9 जणांची पोलीस कोठडी तीन दिवसांसाठी वाढली
नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी या बांधकाम व्यवसायीकाची हत्या झाल्यानंतर त्या घटनेला दोन महिनेपुर्ण होण्याअगोदर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मोठ्या पोलीस फाट्याने दि.31 मे रोजी सहा जणांना पकडले. पुढे यात तीन जणांची वाढ झाली. पहिल्या सहा जणांना दहा जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. म्हणून पुढच्या तीन जणांना सुध्दा 10 जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आज सर्वांची पोलीस कोठडी संपल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.बिरहारी(जगताप) यांनी बियाणी हत्याकांडाच्या खलबतातील नऊ जणांची पोलीस कोठडी तीन दिवसांनी वाढवून दिली आहे.
दि.5 एप्रिल रोजी बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची त्या झाली. त्यानंतर पोलीसांनी भरपूर मेहनत घेत या प्रकरणात या प्रकरणात 9 जणांना पकडले. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. कृष्णा धोंडीबा पवार (28), हरीश मनोज बाहेती(28), हरदिपसिंघ उर्फ हार्डी, लक्की बबनसिंघ सपुरे (28), मुक्तेश्र्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे(25), सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल(28), हरदिपसिंघ सतनामसिंघ बाजवा(35), गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल(24), करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु(30), इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर(35) या सर्वांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी पुन्हा न्यायालयात हजर केले. या प्रकरणात न्यायालयात सादरीकरण करतांना 9 जणांकडून सापडलेल्या पुराव्याचा सविस्तर अहवाल सादर केला. त्यानुसार आणखी तपास शिल्लक आहे, मोबाईल, वॉकीटॉकी, वाहने, सीसीटीव्ही फुटेज या बाबींचे विश्लेषण करणे आहे असे सांगितले. या प्रकरणात उज्जैन (मध्यप्रदेश) या ठिकाणातील राजपालसिंघ ईश्र्वरसिंघ चंद्रावत (29) आणि योगेश कैलासचंद भाटी यांनी तुरूंगात असतांना हे खलबत रचले आहे असे सांगितले. दिपक ज्याचे पुर्ण नाव माहित नाही. या व्यक्तीच्या सांगण्यावरून बियाणी हत्याकांडाचे खलबत रचण्यात आले होते. असे सादरीकरण केले. नांदेड पोलीसांनी विशेष पथक दिल्ली येथील गुन्हा क्रमांक 117/2022 मधील तुरूंगात असलेले आरोपी राजपालसिंघ ईश्र्वरसिंघ चंद्रावत आणि योगेश कैलासचंद भाटी या दोघांना हस्तांतरण वॉरंटद्वारे दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. त्या दोघांना आणल्यानंतर बऱ्याच बाबींचा खुलासा होईल म्हणून पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी विनंती या सादरीकरणात करण्यात आली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.एम.बिरहारी (जगताप) यांनी सध्या अटकेत असलेल्या नऊ जणांना तीन दिवस अर्थात 13 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडी वाढूवन दिली आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/06/04/संजय-बियाणी-हत्याकांडात-2/