2 लाख 98 हजारांची लाच मागणी; तडजोड 1 लाख 30 हजार;पहिला लाचेचा हप्ता 50 हजार स्वीकारताच गजाआड
नांदेड,(प्रतिनिधी)- 2 लाख 98 हजार रुपये लाच मागणी करून त्यातील 50 हजारांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारणाऱ्या सरपंच पत्नीसह शिक्षक नवऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
एका शासकीय कंत्राटदाराने मौजे नांदा (पट्टी म्हैसा), ता. भोकर, जि. नांदेड येथील एक सरकारी कामाचे कंत्राट घेतले होते.ते काम पूर्ण करून त्याचे बिल 13 लाख 40 हजार ग्रामपंचायतकडे सादर केले. त्या बिलाच्या तुलनेत 22 टक्के रक्कम अर्थात 2 लाख 98 हजाराची लाच मागितली.तडजोडी नंतर लाचेचा आकडा 1 लाख 30 हजार रुपये ठरला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत पोलिसांनी त्याची पडताळणी केली आणि सापळा रचून सरपंच श्रीमती सविता आबन्ना दायलवाड (31) मौजे नांदा (पट्टी म्हैसा), ता. भोकर, जि. नांदेड आणि आबन्ना विट्ठल दायलवाड (38 ) शिक्षक जिल्हा परिषद शाळा, बेलपाडा,ता.शहापूर, जि. ठाणे रा. ह.मु. फ्लॅट क्र. 201, बिल्डिंग क्र. 03, एलोट्री अपार्टमेंट, शहापूर, जि. ठाणे मूळ रा. मौजे नांदा (पट्टी म्हैसा), ता. भोकर, जि. नांदेड (सरपंच यांचे पती ) अश्या दोघाना अटक केली.यातील आरोपी महिला सरपंच आणि त्यांचे पती (शिक्षक ) या दोघांनी तक्रारदार यांनी केलेल्या शासकीय कामाचे थकीत बिल अदा करण्यासाठी 1 लाख 30 हजार लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50 हजार रुपये अलोसे महिला सरपंच यांनी स्वतः स्विकारला.दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
पोलीस अधिक्षक पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड,अपर पोलीस अधिक्षक, धरमसिंग चव्हाण,यांच्या मार्गदशनात ही कार्यवाही करण्यात आली.
या कार्यवाहीचे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक अशोक व्यंकटराव इप्पर,ला.प्र.वि. नांदेड हे होते.या सापळा कार्यवाहीच्या प्रमुख श्रीमती मीना बकाल ह्या होत्या.ही कार्यवाही पोलीस निरिक्षक अश्विनीकुमार महाजन, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश श्रीरामे, शेख मुक्तार, बालाजी तेलंगे,चालक निळकंठ यमुनवाड यांनी पार पाडली. याप्रकणाचा तपास पोलीस निरिक्षक श्रीमती मीना बकाल यांच्याकडे देण्यात आला आहे.
यासापळ्याची माहिती देतांना लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.कार्यालय दुरध्वनी – 02262 253512 राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड मोबाईल नंबर – 7350197197,@ टोल फ्रि क्रं. 1064