नांदेड,(प्रतिनिधी)-चौळाखा ता. धर्माबाद येथून एक २० वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे.त्याच्या शोधासाठी धर्माबाद पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे.
दिनांक ७ जून २०२२ रोजी साईनाथ दिगंबर कदम रा.चौळाखा ता. धर्माबाद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा पुतण्या ज्ञानेश्वर शंकर कदम (२०) हा दिनांक १ जून २०२२ सकाळी ९ वाजता चौळाखा येथून धर्माबाद कडे कामाला आला. पण रात्री परत घरी आला नाही.सर्वत्र शोध घेऊन संपल्यानंतर पोलीस ठाणे धर्माबाद येथे माहिती देण्यात आली.धर्माबाद पोलिसांनी या संदर्भाने मिसिंग क्रमांक १४/२०२२ दाखल केला.त्याचा तपास सहायक पोलीस उप निरीक्षक मसलेकर यांच्याकडे देण्यात आला.
धर्माबादचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, चौळाखा ता. धर्माबाद येथून गायब झालेला युवक ज्ञानेश्वर शंकर कदम आहे.त्याचे वय २० वर्ष आहे.रंग गोरा आहे. उंची ५ फूट ७ इंच आहे.त्याने घर सोडतांना पिवळा टी शर्ट जीन्स पॅण्ट भगवी दस्ती परिधान केलेली आहे.त्याने स्पार्क कंपनीचा बूट परिधान केलेला आहे.त्याच्या सोबत पिशवीत शैक्षणिक कागदपत्रे आहेत.त्याला मराठी,हिंदी आणि इंग्रजी बोलता येते.जनतेतील कोणाला हा युवक दिसला तर त्यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात या बाबत माहिती द्यावी.