जारीकोट धर्माबाद येथून 22 वर्षीय युवक बेपत्ता

नांदेड(प्रतिनिधी)-एक 22 वर्षीय युवक जारीकोट ता.धर्माबाद येथून 7 जून रोजी घरातून निघून गेला आहे तो परत आलेला नाही. धर्माबाद पोलीसांनी या युवकाच्या शोधासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
गंगाधर लक्ष्मणराव भोजराज यांनी 11 जून रोजी पोलीस ठाण्यात माहिती दिली की, 7 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता त्यांचा मुलगा आतिश गंगाधर भोजराज (22) हा बसव जयंती कार्यक्रमात जात आहे असे सांगून जारीकोट येथून निघला तो परत आलेला नाही. धर्माबाद पोलीसांनी या प्रकरणी मिसींग क्रमंाक 16/2022 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार एस.ए.आडे अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद पोलीसांनी या युवकाचा शोध घेण्यासाठी एक शोध पत्रिका जारी केली आहे. घरातून गेलेल्या युवक आतीश गंगाधरराव भोजराज याचे वय 22 वर्ष आहे. त्याचा रंग गोरा आहे. उंची 5 फुट 9 इंच आहे. बांधा मजबुत आहे. त्याने घरून निघतांना निळा शर्ट आणि पांढऱ्या रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे. त्याला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, वरील वर्णनाचा आणि फोटो मध्ये दिसणारा युवक जनतेच्या महितीत असेल तर त्यांनी धर्माबाद पोलीस ठाणे येथे या बद्दल माहिती द्यावी सोबतच पोलीस अंमलदार एस.ए.आडे यांचा मोबाईल क्रमांक 9552060875 यावर सुध्दा माहिती देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *