नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पथकातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 23 हजार 500 रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त केले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.सोवानी यांनी आज या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.10 जून रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा क्रमांक 84/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 329, 34 नुसार दाखल झाला होता. या प्रकरणात दरोडेखोरांनी मोबाईल चोरला होता. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पेालीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रवि बामणे, देवसिंग सिंगल, शेख अजहर आणि दत्ता वडजे यांनी आंबेडकरनगर भागातील नितीन रानबा वाघमारे उर्फ नकटा पप्या (35) आणि सावित्रीबाई फुलेनगर नांदेड येथील सय्यद ईलियास सय्यद मुजीब (21) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 84/2022 मध्ये चोरलेला मोबाईलसह एकूण 12 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. या मुद्येमालाची किंमत 1 लाख 23 हजार 500 रुपये आहे. आज दि.11 जून रोजी तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक विश्र्वजित रोडे यांनी वाघमारे व सय्यद ईलियासला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. वाघमारे यांनी पोलीस कोठडी का आवश्यक आहे असे सादरीकरण केले. तसेच आरोपीच्यावतीने ऍड. यशोनिल मोगले यांनी पोलीस कोठडी देवू नये असा युक्तीवाद मांडला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एम.आर.सोवानी यांनी वाघमारे आणि ईलीयासला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दोन मोबाईल चोरांना तीन दिवस पोलीस कोठडी