जबरी चोरी करणारे दरोडेखोर दुचाकी सोडून पळून गेले

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील हर्षनगरकडे जाणाऱ्या टी पॉईंटवर एक जबरी चोरी झाली पण चोरटे आपली मोटारसायकल सोडून पळून गेले. मुखेड बस स्थानक आगार प्रमुखाचे घरफोडण्यात आले आहे. जुना मोंढा भागात एक किराणा दुकान फोडण्यात आले आहे. वजिराबाद, भाग्यनगर आणि हदगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 1 लाख 91 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
मंदार अजय माने हा विद्यार्थी हर्षनगर भागात राहतो. 10 जूनच्या रात्री 9.30 वाजता तो हर्षनगर कॉर्नवर थांबला असतांना तीन जण आले आणि त्याच्या कानातील मोबाईलचा एअरफोन व रोख 900 रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यावेळी दत्ता पाटील खराटे यांना माहिती मिळाली तेंव्हा तेथे ते गेले आणि दरोडेखोर मोटारसायकल सोडून पळून गेले. लुटमार करणाऱ्याचा एक मित्र पुन्हा मोटारसायकल घेवून जात असतांना खराटे पाटील यांनी त्याला विचारपुस केली तेंव्हा तोही पळून गेला. या बाबत विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमंाक 199/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 392,34 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक बुरकुले अधिक तपास करीत आहेत.
दत्तात्रय गणपतराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बसस्थानक परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये आगार प्रमुखांचे निवासस्थान आहे. दि.11 जून च्या सकाळी 9 वाजता ते घर फोडलेले दिसले. पोर्चच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि 40 हजार रुपये किंमतीच्या ऍल्युमिनीएम खिडक्या चोरून नेल्या आहेत. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
रुपा जितेंद्र मक्तेदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 जून 2022 रोजी दुपारी 2.25 वाजेच्यासुमारास त्या जुना मोंढा येथील गंगासहाय किराणा दुकान येथे आले होते. त्यांना किराणा दुकानाची उधारी देणे बाकी होते. त्यासाठी त्यांनी 71 हजार रुपये रोख रक्कम व 22 हजार रुपये किंमतीचा बेअररचेक पिशवीत ठेवून आणला होता. पण ती पिशवी कोणी तरी चोरट्यांनी चोरली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मुनीर अधिक तपास करीत आहेत.
अजय मारोती नरवाडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एक्स.9382 ही 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी 15 जूनच्या सायंकाळी 4.30 ते 5.40 यावेळेत पोस्ट ऑफीस नांदेड येथून चोरीला गेली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शिंगे अधिक तपास करीत आहेत.
लक्ष्मीबाई सुधाकर वडारे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.जे.0810 ही 8 जूनच्या रात्री चोरीला गेली. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत. या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे.
विकास शंकर कुबडे यांची 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.एफ 9357 ही 30 मे ते 31 मे दरम्यान चोरीला गेली. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अंमलदार मेलवाड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *