नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत लतिफ पठाण आणि महिला कारकून एन.बी.ओघे यांच्याविरुध्द प्रशासकीय अनियमिततेसाठी विभागीय चौकशीचा परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचे आदेश औरंगाबाद येथील उपायुक्त पुर्नवसन यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठविले आहेत.
सध्या नांदेड जिल्ह्यात प्रभारी पदावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे पद सांभाळणाऱ्या लतिफ पठाण यांच्याकडे पुर्वी उपविभागीय अधिकारी नांदेड आणि भुसंपादन अधिकारी नांदेड अशी दोन पदे होती. त्यांनी आणि त्यांच्या कार्यालयातील महिला कारकून एन.बी.ओघे यांनी जमीनीचा मावेजा वाटप करतांना अनेक घोटाळे केले. याबाबत कायदेशीर तरतूदींना वगळून विसंगत कृती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या दोघांविरुध्द प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्याबाबतचा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील तरतूदीनुसार विभागीय चौकशीचा परिपूर्ण प्रस्ताव महसुल शाखेस पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यास सांगितले आहे.
लतिफ पठाण यांच्याविरुध्द अनेक जणंानी अनेक तक्रारी केल्या होत्या. आता उपायुक्त पुर्नवसन पांडूरंग कुळकर्णी यांनी विभागीय चौकशीचा परिपुर्ण प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिल्याने आजपर्यंत लतिफ पठाण यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांना उघड होण्याची वेळ आली आहे.
डीएसओ लतिफ पठाण आणि महिला कारकून ओघेची होणार विभागीय चौकशी