नांदेड(प्रतिनिधी)-अनेक जणांना मध्य रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून 32 लाख 90 हजारांना गंडा घालणाऱ्या 3 जणांविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका व्यवस्थितपणे चालणाऱ्या रॅकेटने सन 2016 ते 2019 दरम्यान राज कॉर्नर नांदेड, नागपूर, मुंबई येथे नांदेड जिल्ह्यातील अनेकांना मध्यरेल्वेमध्ये तृतीय आणि चतुर्थश्रेणी वर्गात नोकरी लावतो म्हणून अनेकांकडून 32 लाख 90 हजार रुपये गंडवले. दिलेले आदेश हे बोगस होते. त्यानंतर रामेश्र्वर गोविंदराव चिटगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर लक्ष्मण राठोड, जनार्धन रामदास पवार आणि राजेंद्रप्रसाद तिवारी या तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 202/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे हे करणार आहेत.
रेल्वेत नोकरीसाठी अनेकांना 32 लाख 90 हजारांचा गंडा