नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पिक कर्ज, बी-बियाणे, खत आणि औषध शासनाने तातडीने देण्याची विनंती करणारे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना आम आदमी पार्टी जिल्हा नांदेडच्यावतीने देण्यात आले आहे.
आम आदमी पार्टी नांदेड महानगरच्यावतीने अध्यक्ष प्रा.देविदास शिंदे, डॉ.एम.जे. कादरी, दिलीप जोंधळे, चरणप्रितसिंघ कुमार, डॉ.गौतम कापूरे,ऍड. जगजीवन भेदे, ऍड. सुमंत लाठकर, ऍड. शिलवंत शिवभगत, ऍड.टी.सी.कांबळे, मोहम्मद आवेस, एस.जी. कठारे, अब्दुल वाहब, ऍड.विशाल गच्चे आदींच्या स्वाक्षरीने एक निवेदना नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यात शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे. गेल्या अनेक दशकांपासून अनेक अडचणींना सामोरे जात आहे. अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, कोरोना काळ, यामुळे वेळेवर पेरणी कर्ज मिळाले नाही. बाजारात अनेक बोगस कंपन्यांनी शिरकाव केल्यामुळे निकृष्ठ बी-बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी मागच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या बांधावर बि-बियाणे , खते आणि औषधे उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांचे कुटूंब उध्दवस्त होवू नये याकरीता आम आदमी पार्टी नांदेड आपल्याकडे विनम्र विनंती करत आहे.
शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे द्या-आम आदमी पार्टी