नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे माजी पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब नियंत्रण कक्षात असतांना सुध्दा व्हॉटस्ऍप माध्यमाने आपल्या ठाण्यातील कारभारावर नियंत्रण ठेवतात. असा अधिकार असतो का? ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा आदेश मानायला हवा का? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
तंत्रज्ञानाची प्रगती वाढली तशी पोलीसांच्या कामात सुध्दा तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरू लागले. प्रत्येक पोलीस ठाण्याचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक स्वतंत्र व्हॉटस्ऍप गु्रप तयार करण्यात आला. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सुध्दा असे विविध व्हॉटस्ऍप गु्रप कार्यान्वीत आहेत आणि या गु्रपच्या माध्यमातून प्रभारी अधिकारी आपल्या सर्व मातहतांना निर्देश देत असतात. त्यानुसार विभागाचे कामकाज चालत असते.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिवाजी पाटील यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली. त्यांना अटक झाली. त्यानंतर सन 2020 मध्ये पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना अगोदर पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरिक्षक करण्यात आले. मुळ राखीव पोलीस निरिक्षक सुट्टीवरून हजर झाल्यानंतर त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देत नियंत्रण कक्षात हजर राहण्यास सांगितले. या आदेशाची अंमलबजावणी त्यांनी केली की नाही याची तर तासाला माहिती विचारण्यात आली. श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब नियंत्रण कक्षात आले की नाही याची माहिती मात्र प्राप्त झाली नाही. त्यांच्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
आज प्राप्त झालेल्या एक व्हॉटसऍप चॉटनुसार श्री. अशोकरावजी घोरबांड साहेब नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर नजर ठेवून आहेत. पहिल्या संदेशात घोरबांड साहेब लिहितात आज 14 तारीख आहे सर्व तपासीक अंमलदारांनी उपरोक्त गुन्ह्यांचे घटनास्थळ त्वरीत करून घ्यावेत. दुसऱ्या संदेशात श्री.घोरबांड साहेब हजेरी मेजरला उद्देशून लिहितात सर्व आयओंना या कामाबद्दल तसदी द्यावी. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घ्यावे. पाळी प्रमाणे बोलवावे. या संदेशाला हजेरी मेजर उत्तर देतात ओके सर्व सर्वांना फोन करून सांगतो. त्याला पुढे श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब लिहितात फोन करून चालणार नाही. सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून घ्यावे.
हा व्हॉटस्ऍप संदेश गु्रप फक्त नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यासाठी आहे. श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना जिल्ह्याची जबाबदारी देवून नियंत्रण कक्षात बसविण्यात आले असतांना सुध्दा ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवत आहेत. अशी स्थिती आली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर काय निर्णय घ्यावा, त्यांनी काय करावे याबद्दलचा शोध कोठे लेखी स्वरुपात मिळतो काय तो घेतला. पण तसे काही सापडले नाही. सोबतच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी सध्या पोलीस निरिक्षक दिपक बोरसे आहेत की, श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आहेत. याबद्दल कोणी तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांना मार्गदर्शन करण्याची गजर आहे.
श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आजही नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर नियंत्रण कक्षातून ठेवतात नियंत्रण