‘नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स’चा शंभर टक्के निकाल

नांदेड,(प्रतिनिधी)-आस्था एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित ‘नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स’चा शंभर टक्के निकाल लागला आहे. या कॉलेजला ‘कॉन्सील ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडिया’ची मान्यता आहे. या अंतर्गत असलेल्या डीएम एलटीचा उमेश जोंधळे हा सर्व प्रथम आला आहे. तर डायलेसिस टेक्निशियन या अभ्यासक्रमात महरिन फरहाना ही सर्व प्रथम आली आहे. तर बीएससी ऑप्टिमेटरी यामध्ये हुमेर बेग हा सर्व प्रथम आला आहे. यासह सात विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

   आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संस्थापक सदस्याच्या माध्यमातून नृसिंह दांडगे यांनी ब्लड डोनेशन कमिटी चेअरमन पदावरून विविध रक्तदान व आरोग्य शिबिरे आयोजित केली होती. मराठवाड्यातील गरजवंतांना आरोग्य उपक्रमांचा लाभ नृसिंहराव दांडगे यांनी मिळवून दिला होता. या कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबियांनी पुढे चालू ठेवला असून वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून बारावी पास विद्यार्थ्यांना डीएमएलटीसह अन्य विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अमेरिकेचे इंटरनॅशनल अ‍ॅक्रेडियशन तसेच जयपूर येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी जयपुर या युजीसीकडून मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या माध्यमातून डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा व पदवीचे बी वोक इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, रेडिओलॉजी ,मेडिकल इमेजिंग टेक्नोलॉजी, ऑप्टोमेट्री टेक्नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, फिजिओथेरपी, तसेच एम वोकचे विविध अभ्यासक्रम या महाविद्यालयाच्या माध्यमातून शिकविले जातात. इतर शिक्षण व नोकरी करतही पार्ट टाइम व रेग्युलर कोर्सच्या माध्यमातून या शिक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो, गरजूंनी या संधीचा लाभ घेण्यासाठी नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स, श्यामनगर, नांदेड जुनी नागार्जुना इंग्लिश स्कूलच्या शेजारी असलेल्या कार्यालयात येऊन अथवा 9421291444, 9552559118 वर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *