व्हायरल व्हिडीओचा एसीबीने प्रसिद्ध केलेला खूलासा तकलादू

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयला लाच घेण्याच्या कारणासाठी नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडली आणि कोणी तरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर एएसआयला न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले. पोलीस कोठडी प्राप्त झाल्यानंतर एसीबीने एक खुलासा सार्वजनिक केला. तरी पण खुलाश्यात लिहिलेली पिस्टल आणि व्हिडीओमध्ये दिसत असलेले चित्रीकरण यात कोठेही साम्य नाही. विशेष म्हणजे एसीबीने एलसीबीच्या कर्मचाऱ्यावर केलेली ही पहिलीच सापळा कार्यवाही असतांना याबद्दलची प्रेसनोट सुध्दा जारी करण्यात आली.

दि.13 जून रोजी एलसीबीच्या एका एएसआयला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजारांची लाच घेतली म्हणून ताब्यात घेतले. त्यावेळी ज्या ठिकाणी घटना घडली त्याठिकाणी कोणी तरी व्हिडीओ चित्रीकरण केले आणि ते व्हिडीओ चित्रीकरण व्हायरल झाले. याबाबत वास्तव न्युज लाईव्हने सुध्दा बातमी प्रकाशीत केली. या सापळा कार्यवाहीची माहिती एसीबीने व्हॉटसऍप ग्रुपवर प्रसारीत केली. त्यात हॅश व्हॅल्यू काढण्यात आला असेही लिहिलेले नव्हते. तसेच एक लेखी प्रेसनोट प्रसारीत केली जाते ती सुध्दा प्रसारीत केली नव्हती.सोबतच पहिली प्रसारीत केलेली प्रेसनोट ज्यात लाचेची रक्कम अंग झडतीत दाखवली आहे.पण फिर्यादीत लाचेची रक्कम कार मधून जप्त दाखवलेली आहे. त्यानंतर 14 जूनच्या रात्री 2 वाजता गुन्हा दाखल झाला. एलसीबीच्या एएसआयला अटक झाली. त्यास न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले. त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत 14 जून रोजी सायंकाळी व्हॉटसऍप गु्रपवर एसीबीने खुलासा प्रसारीत केला. त्यात पोलीस निरिक्षक कदमने आरोपी भानुदास वडजेचे पिस्तुल काढून आपल्या कंबरेच्या डाव्या बाजूला लावले असे लिहिले आहे. आरोपीने आरडा ओरड सुरू करून स्वत:वर गोळी झाडण्यासाठी पिस्तुल मागितला असे लिहिले आहे आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला असे लिहिले आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर कोणाला वाटेल की, क्रिम कलर हाफ बाह्याचा शर्टमध्ये दिसणारे एसीबीचे अधिकारी पी.आय.कदम आरोपीच्या खिशात काही तरी टाकत आहेत. पण वास्तविकता तशी नाही असे या खुलाशात लिहिले आहे. वास्तवीकता अशी आहे की, पी.आय.कदम हे वारंवार स्वत:च्या कंबरेला ठेवलेले जप्त केलेले पिस्तुल उजव्या हाताने वारंवार तपासत आहेत. याच वेळी आरोपी पळून जावू नये म्हणून त्याच उजव्या हाताने आरोपीचा पट्टा धरत आहेत. त्यामुळे व्हिडीओवरून निघालेले गृहीतक बरोबर नाही.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागात काम करणारा प्रत्येक अधिकारी आणि पोलीस अंमलदार हा राज्य आणि जिल्हा पोलीस दलातूनच आलेला असतो. पोलीस ठाण्यात होणारी कामे कशी होतात हे त्यांनापण माहित असते. सन्मानिय श्री.कदम साहेब आपल्या डाव्या कंबरेला हात लावत नाहीत तर डाव्या खिशात हात टाकत आहेत आणि तो हात पुन्हा वडजेजवळ आल्यावर तो म्हणतो आहे माझ्या खिशात काही ठेवू नका, मला फसवू नका. व्हिडीओमध्ये मला पिस्तुल द्या, मला स्वत:वर झाडून घ्यायेची आहे असे तो कोठेच म्हणत नाही. कदम साहेबांनी आपल्या डाव्या खिशात हात टाकून बाहेर काढला आणि वडजेच्या उजव्या खिशात टाकला त्यानंतर वडजेला मागच्या बाजूने पकडणारा लाल शर्टचा व्यक्ती कदमसाहेबांकडे पाहुन का हसतो आहे याचेही उत्तर या खुलाशात नाही. कारण आपल्या कार्यवाहीने एखाद्याच्या जीवनाची वाट लागणारी असते तेव्हा त्यात हसण्यासारखे काय आहे? 3 पानांची टंकलिखीत पिसीआर यादी तयार केल्यानंतर त्यात क्रमांक 6 हाताने लिहून व्हिडीओ बाबत चार शब्दांचा केलेला उल्लेख काय आहे. ते पीसीआर मागणीचे कारण कसे होऊ शकते. त्या चार शब्दातील तीन शब्द कळतात पण चौथा कळतच नाही. वडजे आणि एसीबी मध्ये काय काय बोलणे व्हिडीओ नंतर झाले ते सुद्धा वडजे जामीन मिळाल्यावर सांगणारच आहे. असो भ्रष्टाचार करून जनतेला त्रास देणाऱ्या विरुद्ध आपली जबाबदारी पार पडतांना एसीबी नेहमीच अग्रेसर ठरो,एसीबीचे नाव राजा हरिचंद्रा सारखे उज्जवल व्हावे अशीच शुभकामना कारण भ्रस्टाचारानें देश पोखरला जात आहे.

संबंधित बातमी …..

https://vastavnewslive.com/2022/06/14/लाच-लुचपत-प्रतिबंधक-विभा/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *