नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने आता एकल वापर प्लॉस्टिक पुर्णपणे बंद केले आहे. त्यानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार असा एकल वापर कोणी करील तर त्यांच्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. जनतेने विघटनकारी वस्तूंचा वापर प्लॉस्टिक ऐवजी करावी असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
महाराष्ट्र शासनाची अधिसुचना प्लॉस्टीक बंदी संदर्भाने 2018 मध्ये जारी झाली. त्यात प्लॉस्टीक व थर्माकॉल या अविघटनशिल वस्तूंचे वापर, उत्पादन, वाहतूक, हाताळणी, साठवणूक यांना बंदी करण्यात आली. पुढे 12 ऑगस्ट 2021 रोजी एकल प्लॉस्टीक वस्तुची निर्मिती बंद करण्यात आली. ज्यामध्ये सजावटीचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगरेट पॉकीट, प्लॉस्टिक काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टीकच्या काड्या, प्लॉस्टिकचे झेंडे, कॅन्टी आणि आईस्क्रिम काड्या, प्लॅटे, कप, ग्लास, कटलरी, काटे, चिमचे, स्ट्रॉ, चाळण्या, 100 मायक्रॉनपेक्षा कमी असलेले प्लॉस्टिक किंवा पीव्हीसी बॅनर अशा वस्तुंचे उत्पादन वापर, साठवणूक, वितरण यांना बंदी आहे.
या संदर्भाने 17 जून रोजी स्थानिक प्लॉस्टिक विक्री व्यापारी, महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकल वापर प्लॉस्टिकमध्ये कोणते घटक असतात आणि त्यामुळे काय धोका आहे याबद्दल चर्चा झाली. आता सिंगल युज प्लॉस्टिक(एकल वापर प्लॉस्टिक) वापर, वाहतूक, साठवणूक आणि विक्री यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा 5 हजार दुसऱ्यांदा 10 हजार आणि तिसऱ्यांदा 25 हजार रुपये दंडासह 3 महिन्याचा कारावास अशी शिक्षा होणार आहे. मनपाने जनतेला आवाहन केले आहे की, अशा प्रकारे एकल वापर प्लॉस्टिक वस्तुंचा उपयोग करू नका त्या ऐवजी विघटनकारी वस्तुंचा पर्याय म्हणून वापर करा नसता दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे.