
नांदेड(प्रतिनिधी)-शालांत परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला त्यात लातूर शिक्षण बोर्डाच्या तीन जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि उस्मानाबाद जिल्हा पहिल्या क्रमांकात आहे. मागील कांही वर्षांपासून परिक्षांमध्ये मुलीच नेहमीच बाजी मारत आहेत. यंदाच्या एसएससी बोर्ड परिक्षेत मुलीनीच बाजी मारली आहे. बोर्डाचा एकूण निकाल 97.27 टक्के आहे. त्यात प्रथम क्रमांक उस्मानाबाद 97.84 टक्के, द्वितीय लातूर 97.63 टक्के आणि नांदेड तृतीय 96.68 टक्के. यंदाच्या बोर्ड परिक्षेत पुर्नर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णची टक्केवारी 81.65 टक्के आहे.
यंदाच्या बोर्ड परिक्षेत एकूण 1 लाख 7 हजार 950 विद्यार्थी-विद्यार्थींनी परिक्षेसाठी नोंदणी करणारे होते. त्यातील 1 लाख 5 हजार 890 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात गुणवत्तेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी 56 हजार 122 आहेत. ग्रेड-1 मध्ये 32 हजार 289, ग्रेड -2 मध्ये 12 हजार 642 आणि उत्तीर्ण या सदरात 1950 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परिक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 3 हजार 03 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील परिक्षार्थी 45 हजार 29 होते. त्यात उत्तीर्ण झालेले 43 हजार 535 आहेत. पुर्नर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 3 हजार 543 आहे. त्यातील 2 हजार 893 उत्तीर्ण झाले आहेत. ती टक्केवारी 81.65 टक्के आहे.
नांदेड जिल्ह्यात परिक्षार्थी मुलांची संख्या 23 हजार 836 आहे, मुलींची संख्या 21 हजार 193 आहे. त्यात अनुक्रमे उत्तीर्ण होणारी संख्या 22 हजार 780 आणि 20 हजार 755 आहे. अशीच संख्या उस्मानाबादमध्ये 11 हजार 965 आणि 9852 आहे. उत्तीर्ण संख्या 11640 आणि 9707 आहे. अशीच मुलामुलींची संख्या लातूर जिल्ह्यात 21622 आणि 17422 आहे. उत्तीर्ण झालेल्या मध्ये 20987 आणि 17 हजार 134 आहे. बोर्डात नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये 57423 मुले परिक्षेला होती त्यातील 55407 उत्तीर्ण झाली आहेत. मुलींची संख्या 48467 होती त्यात 47596 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. टक्केवारीमध्ये मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 98.20 आहे. तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 96.48 आहे.