नशामुक्ती केंद्र चालविणाऱ्याला नशेसाठीच पैसे मागून जिव घेणा हल्ला;दोन युवकांना तीन दिवस कोठडी 

नांदेड(प्रतिनिधी)-नशामुक्ती केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीवर नशेसाठी पैसे मागून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न घडला आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी  दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
पंजाब राज्यातील दिलबागसिंघ अवतारसिंघ मान (46) हे पंजाबमध्ये नशामुक्ती केंद्र चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार  नशेच्या आहारी गेलेल्या दोन युवकांनी त्यांना नांदेड येथे दर्शनासाठी घेऊन जाण्याची विनंती केली.तेव्हा ते त्या दोघांना घेऊन 12 जून रोजी नांदेडला आले. दि.15 जून रोजी मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास पंजाब राज्यातील गुरमनराजसिंघ दलजितसिंघ (32) आणि सुखज्योतसिंघ चरणपालसिंघ बरार (28) या दोघांनी दिलबागसिंघकडे नशाकरण्यासाठी पैसे दे अशी मागणी केली. त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या जवळील हत्याराने या दोघांनी दिलबागसिंघच्या पाठीवर आणि दोन्ही हातांवर त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे अधिक तपास करीत आहेत.
                    सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे,पोलीस अंमलदार बबन बेडदे,बालाजी लामतुरे,दिगंबर रेडे, आरलूवाड आदींनी गुरमनराजसिंघ दलजितसिंघ (32) आणि सुखज्योतसिंघ चरणपालसिंघ बरार (28) दोघांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.संजय वाघमारे यांनी पोलीस कोठडी देणे का आवश्यक आहे याचे सादरीकरण केले.युक्तिवाद ऐकून न्या.किर्ती जैन देसरडा यांनी या दोन नशेबाज युवकांना तीन दिवस अर्थात 20 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *