पोखर्णी ता.बिलोली येथे 65 वर्षीय महिलेचा खून करून दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली तालुक्यातील पोखर्णी येथे एका घरात 65 वर्षीय एकट्या महिलेचा तिचा खून केला आणि त्यांनी धारण केलेले सोन्या-चांदीचे दागिणे 67 हजार 500 रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत.

शासकीय सेवेतून सेवानिवृत्त यादवराव हनमंतराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 मे च्या पहाटे 5 वाजता त्यांना त्यांची नातलग महिला गंगाबाई राजप्पा बोडके (65) ही मृतअवस्थेत दिसली. कोणी तरी अज्ञात माणसांनी तिचा गळा दाबून तिचा खून केला होता आणि त्यांनी परिधान केलेले सोन्या-चांदीचे, 67 हजार 500 रुपये किंमतीचे दागिणे चोरून नेले आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *