नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस कोठडी घेतांना व्हायर व्हिडीओवर मोठा युक्तीवाद करत एसीबीचे पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्या दिवशी विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे पाटील यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आज पोलीस कोठडी संपल्यावर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मागतांना अशोक इप्पर यांनी व्हायर व्हिडीओचा साधा उल्लेख सुध्दा आपल्या यादीत केला नाही. यानंतर आलेल्या जामीन अर्जावरची सुनावणी न्यायालयाने 21 जून रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे एएसआय वडजे यांना आता कमीत कमी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार आहे.
दि.13 जून रोजी सायंकाळी 10.30 वाजेच्यासुमारास बीएसएनएल कार्यालयाजवळ स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास शिवलिंगअप्पा वडजे (53)यांनी 10 हजार रुपये लाच घेतली या आरोपातून त्यांना पकडण्यात आले. घडलेली घटना सार्वजनिक ठिकाणची आहे. त्या ठिकाणी अनेकांनी आपल्या हातातील व्हिडीओ कॅमेरे चालू करून त्या घटनेचे शुटींग केले आणि व्हिडीओ व्हायरल पण केला. वास्तव न्युज लाईव्हने त्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या परिस्थितीबाबत वृत्तांकन त्याच दिवशी 13 जून रोजी प्रसिध्द केले. त्यानंतर 14 जून रोजी तो व्हिडीओ जास्त ट्रोल झाला. तेंव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी त्याबद्दलचे एक स्पष्टीकरण जाहीर केले. त्यात व्हिडीओ वरून काढलेले गृहीतक चुकीचे असल्याचे लिहिलेले होते. 14 जून रोजी पोलीस कोठडीची मागणी झाली. त्या दिवशी पीसीआर यादीमध्ये व्हायरल व्हिडीओबाबत चार शब्दात ज्यातील तीन शब्द स्पष्ट दिसत होते एक शब्द तर ओळखूपण येत नव्हता असे वाक्य लिहिण्यात आले. परंतू पोलीस कोठडीची मागणी करतांना एसीबीचे पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर यांनी सर्वात जास्त मोठा युक्तीवाद व्हायरल व्हिडीओवरच केला होता. न्यायालयाने एसीबीची विनंती मान्य केली आणि भानुदास वडजेला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले. पोलीस कोठडीच्या मुद्यांमध्ये एकूण 6 मुद्ये लिहिण्यात आले होते आणि सहावा व्हिडीओचा मुदा हाताने फक्त चार अक्षरांमध्ये लिहिला होता त्यातील तीन अक्षरे वाचता येत होती आणि एक वाचताही येत नव्हते. एसीबीला न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे पोलीस कोठडी प्राप्त झाली. आज पोलीस कोेठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडीत घेण्याच्या विनंतीसह भानुदास वडजेला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावर आणखी पाच मुद्यांचा तपास करणे शिल्लक आहे असे लिहिलेले आहे. या पाच मुद्यांमध्ये त्या दिवशीप्रमाणे सहा मुद्या अर्थात व्हायरल व्हिडीओबाबत काही एक उल्लेख करण्यात आलेला नाही. न्यायालयाने भानुदास वडजेची न्यायालयीन कोठडी मान्य केली. त्यानंतर भानुदास वडजे यांच्यावतीने आलेल्या जामीन अर्जावरची सुनावणी मात्र न्यायालयाने 21 जून 2022 रोजी निश्चित केली आहे. यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे यांना कमीत कमी पाच दिवस आता तुरूंगात राहावे लागणार आहे.
संबधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/06/15/व्हायरल-व्हिडीओचा-एसीबीन/