हिमायतनगर भागात जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे एक जबरी चोरीचा प्रकार घडला आहे. त्यात 12 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

शिवाजी सखाराम भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जून रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास ते पार्डी येथून महिला बचत गटाची मिटिंग संपवून परत हिमायतनगरकडे येत असतांना आईवळा चौकाजवळ तीन अनोळखी लोकांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या तोंडावर मिर्ची पावडर फेकून शिवीगाळ करायला सुरूवात केली. मोटारसायकल सोडून शिवाजी भालेराव आपली बॅग घेवून पळत शेतात गेले. पण बॅग खाली पडली. तेंव्हा दरोडेखोरांनी त्यांची बॅग आणि दुचाकीची चॉबी घेवून निघून गेले. त्यांच्या बॅगमध्ये दहा हजार रुपयांचा एक मोबाईल व 2 हजार 700 रुपये किंमतीचा थम मशीन असा 12 हजार 700 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. हिमायतनगर पेालीसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक एन.बी.चौधरी अधिक तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *