नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय, ऑलम्पीक असोसिएशन नांदेड व नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय ऑलंम्पीक दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 23 जून ते 29 जून 2022 दरम्यन ऑलंम्पीक क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रविवार दिनांक 19 जून रोजी श्री गुरु गोबिंदसिंघजी येथे सकाळी 11 वा. नांदेड ऑलंम्पीक संघटनेचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश आर पारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनेने स्पोर्टस् क्लब, विविध शाळा, क्रीडा शिक्षक, क्रीडा पुरस्कार विजेते क्रीडा संचालक तसेच शहरातील क्रीडा प्रेमींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहाय्यक आयुक्त स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, ऑलंम्पीक संघटनेचे अध्यक्ष रमेश पारे, गुरुदिपसिंघ संधू, अनिल बंदेल, प्रविण कोंडेकर, संजय चव्हाण, शिवकांत देशमुख, अवतारसिंघ रामगढिया, प्रलोभ कुलकर्णी, वृषाली पाटील जोगदंड, एकनाथ पाटील, डॉ. दिनकर हंबर्डे, राजेश जांभळे, जयपाल रेड्डी, जर्नादन गुपिले, बाबुराव खंदारे, राहुल वाघमारे, प्रविण कुपटीकर, विक्रांत खेडकर, रविकुमार बकवाड यांनी केले असून सदरील सप्ताहास सहभाग नोंदविणार्या खेळाडूंना रोख रक्कम, टि शर्ट, टोपी व सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ऑलंम्पीक सप्ताहातील कार्यक्रम –
23 जून – सुदृढ भारत ऑलंम्पिक दौड
24 जून – सायकल रॅली
25 जून – भारत ऑलंम्पीकमध्ये ‘काल, आज व उद्या’ निबंध स्पर्धा
26 जून – भारतीय पुरातन खेळ व ऑलंम्पीक चित्रकला स्पर्धा
27 जून – विविध खेळांच्या जिल्हास्तर स्पर्धांचे आयोजन
28 जून – भारतीय ऑलंम्पीयन भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यावर वकृत्व स्पर्धा
29 जून – ऑलंम्पीक मशाल रॅली व वरील सर्व कार्यक्रमात सहभागी खेळाडूंना बक्षिस वितरण कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरण, पदक विजेता खेळाडूंचा सत्कार याचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा लाभ घेण्यासाठी नांदेडातील क्रीडा प्रेमिंनी उद्याच्या बैठकीत सहभाग नोंदविण्याचे संघटना सचिव बालाजी जोगदंड यांनी कळविले आहे.