नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेने न्यायालयात मागितलेल्या मागणीनुसार शिवाजीनगर पोलीसांनी एका व्यक्तीविरुध्द महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सौ.कुलजितकौर इंदरमोहनसिंघ भाटीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीचे दत्तनगर भागात दोन दुकान आहेत. त्या मिळकतीचा क्रमांक 1-13-703/2 असा आहे. हे दोन दुकान भाटीया यांनी 2005 मध्ये खरेदी केलेले आहेत. त्यांच्या आरोपानुसार गुरचरणसिंघ दिलीपसिंघ सिधू यांनी 3 ऑगस्ट 2016 रोजी 100 रुपयांच्या मुद्रांक कागदावर खोटा करारनामा आणि खोटी सौदाचिठ्ठी केली. हा मुद्रांक कागद मुद्रांक विक्रेता एम.एस.झुंजरवार यांच्याकडून खरेदी केलेला आहे. त्यावर साक्षीदार म्हणून मनिष वैजनाथराव कावळे आणि राजरत्न भास्कर दिपके यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. मुद्रांक कागदावर असलेल्या दिनांकाच्या दोन महिन्यापुर्वी सौदाचिठ्ठी केल्याचे या कागदावरून दिसते. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार केला असून माझी जागा बळकावण्यासाठी हा बनावट पणा केल्याचे तक्रारीत लिहिले आहे.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 231/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471, 504 आणि 506 नुसार गुरचरणसिंघ सिधू विरुध्द दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पुणे हे करीत आहेत.
महिलेचे दोन दुकान बळकावण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली; गुन्हा दाखल