नांदेड(प्रतिनिधी)-नरसी देगलूर रस्त्यावर कुंचेली फाट्याजवळ चार दरोडेखोरांनी एका कुटूंबाला मारहाण करून 1 लाख 66 हजार 400 रुपयांचा ऐवज लुटला आहे. पांगरी, विष्णुपूरी येथून एका पोल्ट्री फॉममधून 60 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगणपूरा येथून 1 लाखांची दुचाकी चोरीला गेली आहे. हिमायतनगर येथे रेल्वेचे दोन खांब बाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जलील खान अहेमद खान पठाण हे आणि त्यांचे कुटूंब गाडी क्रमांक एम.एच.26 एल.1035 मध्ये बसून नांदेड ते देगलूर असा प्रवास करत असतांना कुंचेली फाट्याजवळ कोणी तरी रस्ता आडेल अशी परिस्थिती तयार केलेली होती. गाडीतील व्यक्ती खाली उतरून तो अडथळा पार करत असतांना लपून बसलेल्या चार दरोडेखोरांनी या सर्व कुटूंबियांना पीव्हीसी पाईप आणि लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, महिलांकडील सोने आणि सहा मोबाईल असा एकूण 1 लाख 66 हजार 400 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.जाधव अधिक तपास करीत आहेत. हा प्रकार 19 जूनच्या मध्यरात्री घडलेला आहे.
दत्ता गोविंदराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 जूनच्या मध्यरात्रीपासून ते 19 जूनच्या पहाटे 6 वाजेदरम्यान पांगरी, विष्णुपूरी नांदेड येथील अमरसिंग दखणे यांच्या शेतातील पोल्ट्री फॉममध्ये झोपले असतांना त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कोणी तरी चोरट्याने त्यांच्या घरातील दागिणे आणि रोख रक्कम असा 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे तपास करीत आहेत.
शहरातील मगणपूरा भागात राहणारे हर्षीद हनुमानदास जाजू यांची दुचाकी गाडी 19 जूनच्या मध्यरात्री 2.30 ते पहाटे 5.30 दरम्यान कोणी तरी चोरली आहे. या गाडीची किंमत 1 लाख 50 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंदे अधिकत पास करीत आहेत.
बनविरसिंग उमेशचंद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगर येथील वलिसेठ यांच्या शेतात रेल्वेचे दोन इलेक्ट्रीक खांब 50 हजार रुपये किंमतीचे ठेवलेले होते. या बाबत तपासणी केली असता भंगार दुकानात ते पोल दिसले. याबाबत विचारणा केली असता भंगार दुकानदार उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. त्यामुळे त्यांच्याविरुध्द चोरीचा गुन्हा हिमायतनगर पोलीसांनी दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महाजन हे करीत आहेत.
कुंचेली फाट्याजवळ जबरी चोरी, पांगरीत घरफोडी, मगनपुरात दुचाकी चोरी