नांदेड ग्रामीण पोलीसांनी देशी दारु पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदासिंग कॉर्नर येथे देशी दारु विक्रेत्याला पोलीस निरिक्षक दिपक बोरसे व पोलीस अंमलदारांनी पकडले आहे. पोलीसांनी 4 हजार 200 रुपयांची देशी दारु जप्त केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैद्राबाद रोडवर असलेल्या एका सार्वजनिक ठिकाणच्या दुकानात विना परवाना देशी दारु विक्री व ती दारु पिण्याची सोय असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरिक्षक दिकप बोरसे, पोलीस अंमलदार एस.जी.नलबे आणि केंद्रे यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. त्या ठिकाणी पकडलेल्या देशी दारुची किंमत 4 हजार 200 रुपये आहे. पोलीसांनी त्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *