नांदेड,(प्रतिनिधी)- मौजे पाळज ता.भोकर येथे वीज पडून 3 शेत मजूरांचा मृत्यू घडला आहे .
स्टेशन भोकर हद्दीत आज दि. 21 जून 2022 रोजी सायंकाळी 5.15 वाजता मौजे पाळज ता. भोकर येथील शेत शिवारात शेत मालक प्रतिभा सुधाकर चाटलावार यांचे शेतात पावसात विज पडून शेतात काम करणारे सालगडी, शेतमजूर मरण पावले आहेत.त्यांची नावे राजेश्वर मुत्तेना चटलावार, (45),साईनाथ किशन सातमवार (30) व भोजन्ना पोष्टटी रामनवाड (38) सर्व रा. पाळज हे तिघेही सोयाबीन पेरणी करीत असताना पाऊस पडू लागला.तेव्हा हे तीघे झाडाखाली उभे राहीले आणि त्या झाडावरच विज पडून तीघे मरण पावले आहेत.
पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.