नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील पोलीस नाईक हे पद कमी केले. त्यांना पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संवर्गामध्ये वर्ग करण्याची मान्यता मिळाली. शासनाच्या या निर्णयाला अनुसरून नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड जिल्ह्यातील 84 पोलीस अंमलदारांना, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना त्यांनी विहित अटी पुर्ण केल्या आहेत. यावरून पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे आम्ही कधी तरी फौजदार होवू हे पोलीस अंमलदारांचे स्वप्न आज साकार झाले.
पोलीस दलामध्ये एकूण 30 वर्ष सेवापुर्ण, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर तीन वर्ष सेवा पुर्ण, आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरिक्षक संवर्ग पदाची वेतन श्रेणी घेत असलेले पोलीस अंमलदार या सर्वांना पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने, पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केले होते. या लढ्यासाठी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक मुकूंद दायमा यांनी भरपूर मोठा लढा दिला होता आणि त्याच्याच परिणामात शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 45 वर्ष वय पुर्ण केल्यानंतर पोलीस अंमलदार या पदावर भरती झालेला व्यक्ती पोलीस उपनिरिक्षक होवू शकतो हा यातील मुळ मुद्या आहे.
नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या सर्व विहित अटी पुर्ण करणाऱ्या 84 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलातील पुढील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पात्र ठरले आहेत. बाबू ज्ञानोबा मुंडे, अकुंश रामराव घुगे (नियंत्रण कक्ष), विठ्ठल मारोती मस्के, मधुकर संभाजी नागरगोजे, शामजी रामा जाधव, शेषराम तुकाराम राठोड, बालाजी माधवराव पांडलवार, राम शिवसांब गांजुरे, शेर खान हुसेन खान पठाण, अशोक बळीराम भिसे, दत्ताजी किशनराव कदम, अनिलकुमार जळबाराव बनसोडे, बालाजी पुंडलिकराव केंद्रे, गोविंद गणपतराव जायभाये, एस.के.पाशा एस.के.मुलाना, शेषराव गोपाळराव बर्गे, प्रविण सुधाकरराव पिंपळखेडकर, उत्तम भुजंगराव वाघमारे, त्रिलोकसिंघ निरंजनसिंघ सरदार, अनिल प्रभाकर पांडे, भिमानंद हरीहर महाबळे, दत्ता हसेबा केतवाड, दत्तात्रय नागोराव शल्लाले, प्रल्हाद रामजी बनसोडे (पोलीस मुख्यालय), मोहन अमरसिंग राठोड,गोरख रघुनाथ भोसीकर (विमानतळ), किशन दिगंबरराव केंद्रे (जीपीयु), संजय नामदेवराव केळकर,कृष्णा मलकु कुरके, दिप रामचंद्र भंडारे, अनिल बल्या श्रीवास्त (शहर वाहतुक शाखा), गोविंदराव संभाजीराव मुंडे, जसवंतसिंघ हुजूरासिंघ शाहु (स्थानिक गुन्हा शाखा), मुजिबोद्दीन फेजोद्दीन(धर्माबाद),सुर्यकांत श्रीराम गुट्टे , आनंद किशनराव वाघमारे (नायगाव), व्यंकटराव रामराव गिते, नारायण गोविंदराव गौड (माळाकोळी), सरदार मोहम्मद रहेमान शेख (सोनखेड), रमेश सोनबा कांबळे, ज्ञानेश्र्वर नारायणराव मद्रेवार, भास्कर सोपानराव चौदंते, नागोराव किशन सलाम, गंगुताई पोशट्टी नरतावार, रामप्रभु दगडू राठोड (ईस्लापूर), अशोक माणिकराव इंगळे, रघुनाथ बद्दू राठोड (रामतिर्थ), प्रभु किशनराव केंद्रे (उस्माननगर), विद्यासागर प्रल्हादराव जोंधळे(वजिराबाद), धर्मसिंग मुन्ना राठोड, बाबूराव कुना जाधव, प्रकाश तुकाराम पवार, शिवाजी शामराव वाड (अर्धापूर), हनुमान कनाजी मेश्राम(मांडवी), अमर दशरथ परदेशी, मनोहर भगवान जाधव, केशव विश्र्वनाथ चाटे(जीपीयु), प्रकाश भुजंगराव भालेराव (कुंडलवाडी), चॉंद पाशा नुरशाह सय्यद (किनवट), नारायण शेषराव कांबळे, देगलूर, वसंत हुसेन कनके (सी-47), मोहनराव भुमा राठोड (इतवारा), रघबिरसिंघ हरीसिंघ शाहु(भोकर), भगवान गंगाराम मोरे , विलास माधवराव शिंगे, भिमराव चांदु भद्रे, लक्ष्मण यादवराव ईजळकर(वजिराबाद),शंकर रेशमाजी केंद्रे,उत्तम गोपाळराव गायकवाड (मुक्रामाबाद), केशव रामचंदर राठोड, अजमोद्दीन शमशोद्दीन (तामसा), राजेश प्रभाकर चौधरी (श्वान पथक), जर्नाधन कलप्पा बोधने, व्यंकट लक्ष्मण झेलेवाड (बिलोली),जनकसिंह किशनसिंह ठाकूर (हिमायतनगर) अरुण रामचंद्र जोंधळे, प्रकाश लिंबाजी राठोड (मोटार परिवहन विभाग),सदाशिव पांडूरंग कांबळे(भाग्यनगर), प्रमोद देवराव नसरे (हदगाव), अशोक माधव अत्राम, रामचंद्र नारायण दराडे (माहुर), जगदीश मल्हारराव कुलकर्णी(जिल्हा विशेष शाखा), प्रकाश नरबा कागणे (कंधार), रावसाहेब दिगंबर पवार,किशन हिरामन आरेवार (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग), मोहम्मद निजामोद्दीन शेख (एटीसी), राजेश प्रभाकर चौधरी (श्वान पथक) या सर्व नवीन पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी सावंत यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन करून नवीन जबाबदारीसाठी शुभकामना दिल्या आहेत. या सर्व नवीन पोलीस उपनिरिक्षकांना सध्या आहेत त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात 84 एएसआय झाले फौजदार