नांदेड(प्रतिनिधी)-दुपारी 4 वाजता अर्धापूर येथील डॉ.शंकरराव चव्हाण कॉलेजसमोर झालेल्या अपघातात एका 60 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
दि.24 जून रोजी 4 वाजेच्यासुमारास अर्धापूर शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण कॉलेजसमोर दुचाकी एम.एच.26 बी.एल.1690 आणि छोटा हत्ती चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.ई.3012 यांच्या अपघात घडला. दुचाकी गाडी संभाजी तुकाराम कवडे (60) हे व्यक्ती चालवत होते. अपघात घडल्याची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरिक्षक चव्हाण, पोलीस अंमलदार रमाकांत शिंदे, महेश कात्रे, वसंत शिनगारे आदींनी जखमी संभाजी कवडे यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान एक तासात संभाजी कवडे यांचा मृत्यू झाला. संभाजी कवडे यांच्या पश्चात 3 मुले, 2 सुना, नातवंडे असा परिवार आहे. अपघातासंदर्भाची कायदेशीर कार्यवाही पोलीस ठाणे अर्धापूर येथे वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.