भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने सहा चोरट्यांना पकडून पाच चोरीचे गुन्हे उघड केले

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने भरपूर वजनदार कामगिरी करत सहा चोरट्यांकडून विविध पाच चोरीच्या गुन्ह्यातील 2 लाख 79 हजार रुपयंाचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी लखन भिमराव इरंडकर (22) रा.बाभुळगाव कारखाना ता.वसमत जि.हिंगोली, पिराजी धुरपत पवार (27) रा.बडुरवाडा ता.वसमत जि.हिंगोली, चांदु सुग्रीव जाधव (29) रा.हयातनगर ता.वसमत जि.हिंगोली, मोहम्मद मोबीन मोहम्मद जिलानी (30) रा.लेबर कॉलनी नांदेड, अशरफखान परवेज खान (25) रा.तेहरानगर नांदेड, भिमा नरसींग वाघमारे (30) रा.ओंकारेश्र्वरनगर तरोडा यांना ताब्यात घेतले. त्यांनी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 113, 162, 178, 179, 193/2022 या पाच गुन्ह्यामध्ये चोरी केलेला भरपूर ऐवज पोलीसांना काढून दिला. त्या ऐवजाची किंमत एकूण 2 लाख 79 हजार 50 रुपये आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे, पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत जाधव, पोलीस अंमलदार रावसाहेब जाधव, किशोर हुंडे, धनंजय कुंभरवाड, प्रदीप कर्दनमारे, हनवता कदम, ओमप्रकाश कवडे, सुमेध पुंडगे आणि सायबर सेलमधील राजेंद्र सिटीकर यांचे या उत्कृष्ट कामासाठी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *