नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)-व्हॉटसऍपवर चोरून काढलेले फोटो व्हायरल करून इतरांची बदनामी करतांना आपणही लक्षात ठेवले पाहिजे की आपले घर सुध्दा काचेचे आहे. ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी कांही दिवसांपुर्वी बार्शी न्यायालयात त्यांच्या हस्तकांनी चोरून काढलेले फोटो व्हायरल केले आणि वकीली बंद झाल्यामुळे पत्रकारीतेत प्रवेश करण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. आता एक महिलेला हाताशी धरुन दुसऱ्या महिलेवर आणि तिच्या कुटूंबियांवर चिखल फेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऍड. मनिष शर्मा विरुध्द महिलेनेच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कुटूंबाला ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांच्याकडून जीवीताचा धोका असल्याची तक्रार पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दिली आहे.
मार्च महिन्यापासून सुरू झालेला खेळ अत्यंत रोचक आहे. दोन बंधूंमध्ये भांडणे लावून आपले इप्सीत साध्य करण्याचा प्रयत्न करतांना ऍड. मनिष शर्माने बार्शी पोलीस ठाण्यात नांदेडच्या खंडेलवाल कुटूंबियांविरुध्द गुन्हा क्रमांक 165/2022 दाखल करायला लावला. याप्रकरणात चार नावे आरोपीची होती. त्यातील एक हा विदेशात राहतो. पण दुर्देवाने आपले वडील आजारी आहेत त्यांना भेटण्यासाठी तो आलेला होता व्यक्ती आपल्या नियोजित परतीच्या तिकिटानुसार परत गेला. तो नांदेडला दवाखान्याजवळ किरायाची रुम घेवून वडीलांची देखभाल करत होता. पण घटना घडली तेंव्हा दुर्देवाने तो विदेशी नांदेडमध्ये हजर होता. याचा फायदा घेतला. इतर तीन आरोपींमध्ये दोन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. कायद्याचा खेळ मी रोजच करतो असे लोकांना सांगून खंडेलवाल कुटूंबियांना त्रास देणाऱ्या ऍड. मनिष शर्माने गुन्हा क्रमांक 165 मध्ये दोन नवीन कलमे जोडायला लावली. त्याचा एकही पुरावा आजपर्यंत सादर केला नाही. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 ला बार्शी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले. दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची यादी आल्यानंतर त्याला कायद्यातील तरतुदीनुसार जामीन मिळेल याला शह देण्यासाठी या प्रकरणातील तक्रारदार महिलेकडून एक अर्ज द्यायला लावला. त्या दोन दिवशी ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील ) हा बार्शी न्यायालयात त्या तक्रारदार महिलेसोबत हजर होते. एवढेच नव्हे तर आपले स्वत:चे शपथपत्र देवून न्यायालयासमक्ष कांही पुरावा देण्याचा प्रयत्न केला. बार्शी न्यायालयाने ते शपथपत्र आणि पुरावा फक्त ठेवून घेतला. त्यावर सीन ऍन्ड फाईल असे लिहिले आहे अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्या दिवशी न्यायालयात तक्रारदार महिलेकडून देण्यात आलेला अर्ज जगातील प्रत्येक व्यक्तीला शहारे आणणारा आहे. या अर्जात त्या महिलेले मला नवीन शपथपत्र दाखल करायचे आहे यासाठी परवानगी मागितली होती आणि त्या शपथपत्रात गुन्हा क्रमांक 165 मधील आरोपी क्रमांक 1 ते आपल्या अल्पवयीन बालिकेले अनसीन फोटो काढले आहेत. असा मजकुर होता .त्या दिवशी न्यायालयाने अटक झालेल्या आरोपीला तक्रारदार महीलेचा अर्ज ऐकता यावा म्हणून न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठवले. दुसऱ्या दिवशी मात्र न्यायालयाने त्या तक्रार महिलेचा अर्ज निकाली काढला आणि अटकेतील आरोपीला सशर्त जामीन मंजुर केला. सोबतच इतर दोन आरोपींना बार्शी जिल्हा न्यायालयाने सशर्त अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे.
बार्शीला जातांना ऍड .मनिष शर्माने आपल्या व्हाटसऍप स्टेटसवर वे टु बार्शी असे शब्द लिहिले होते पण हे लिहितांना ते रिर्टन टु नांदेड आणि त्या नंतर वे टू ग्रेव्ह यार्ड पण येतात याचा विसर बहुदा आपल्या वकील व्यवसाय चालत नसतांना सुध्दा त्यांच्या लक्षात राहिले नाही. वकील साहेबांनी अशाच अनेक प्रकरणांमध्ये आपली फिस वाढविण्यासाठी त्या प्रकरणातील पुरूषांना काय-काय अश्र्वासने दाखवली असतील. पण त्या पुरुष मंडळीचे काय वाईट झाले याचा कांही उल्लेख मात्र कधी ते करत नाहीत अशा प्रकारे एखाद्या बापाविरुध्द आपल्या पाल्यांना सोडून गेलेल्या आईने तीन महिन्यानंतर पोक्सोचो वापर करण्याची अक्कल त्या आईमध्ये असते काय ? ती अक्कल ऍड. मनिष शर्मानेच त्या आईच्या डोक्यात टाकली असेल. त्यांनी तर मी बार्शीला या प्रकरणासाठी न्यायालयात हजर झालो याची भरपूर प्रसिध्दी केली. पण भारतीय संविधानाने कायद्याला सर्वात मोठे स्थान दिलेले आहे. याचा विसर चालबाज्या करतांना ऍड. मनिष शर्माला पडला असेल.
आज या प्रकरणातील परिस्थितीनुसार आता ऍड. मनिष शर्माच्या हातात कांही शिल्लक राहिले नाही म्हणून त्यांनी आता त्या तक्रारदार महिलेला आपली बालके बळजबरीने नांदेड येथून पळवून नेण्याची नवीन आयडीया दिली. त्यासाठी कांही गुंड पण पुरवले. पण भले हो त्या बालकांचे ज्यांनी वाईट परिस्थितीमध्ये सुध्दा आपल्या मोठ्या आईलाच आपली आई मानली आणि वाईट परिस्तिथितीत तीला बिलगुन राहिले. शाळेच्या प्रशासनाने सुध्दा सत्य माहित असल्यामूळे बालकांची आणि त्यांच्या मोठ्या आईचीच मदत केली. नंतर त्या मोठ्या आईने भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 288/2022 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार रावसाहेब जाधव हे करीत आहेत. जेथे हा प्रकार घडला तेथे सुध्दा सीसीटीव्ही आहेत. या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मला व माझ्या कुटूंबियांना त्रास देण्याचा कट रचणाऱ्या ऍड .मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) याला गुन्हा क्रमांक 165 च्या तक्रारदार महिलेला आणि त्यांच्या हस्तकापासून आम्हाला संरक्षण देवून त्यांना प्रतिबंधीत करावे असेही या महिलेने आपल्या पुरवणी अर्जात म्हटले आहे.
या प्रकरणाच्या संदर्भाने नांदेडच्या महिलेसोबत राडा करणाऱ्या बार्शी येथील महिलेला शोधण्यासाठी भाग्यनगर पोलीसांनी आपल्या दोन महिला पोलीस अंमलदार ऍड. मनिष शर्माच्या घरी पाठवल्या होत्या. त्या ठिकाणी पोलीसांना ऍड .मनिष शर्मा म्हणाले होते कमी, वॉरंट नसतांना माझ्या घराची तपासणी करा पण माझ्या या प्रकरणाशी कांही एक संंबंध नाही. असे म्हणत असतांना ती महिला कोणत्या चार चाकी गाडीत फिरत होती याचे उत्तर पण ऍड. मनिष शर्मा यांनी दिले पाहिजे. बार्शी न्यायालयात दाखल केलेले शपथ पत्र आपलेच आहे तर कसा आपला या प्रकरणाशी संबंध नाही. काय आहे तो संबंध हे तर सांगा वकील साहेब,(त्या महिले सोबत आपले बार्शी न्यालयातील फोटो सुध्दा आता आम्हाला उपलब्ध झालेले आहेत) तर जगालाही आपली वकीली कळेल कायद्याच्या प्रक्रियेने सर्व कांही सुरू राहु द्या आपण ज्या महिलेसाठी वकीली करत आहात त्यांना न्यायही मिळून द्या पण न्याय देणे यावर स्वाक्षरी मात्र न्यायाधीशांची असते हे मात्र कधी विसरु नका, उगीच खोट्या भुलथापा देवून नोबल प्रोफेशनला काळीमा फासू नका.जगात एकच वकीली हा व्यवसाय आहे ज्याच्या अगोदर नोबल शब्द लावला जातो. या खंडेलवाल कुटूंबियातील अनेकांना आपण व्हॉटसऍप, कॉल, फेसबुक मॅसेंजरवर पाठवलेले संदेश आठवा हे प्रकार सुध्दा तंत्रज्ञान कायद्याच्या कक्षेतील आहेत. वकीली जरूर करा पण वकीलांना लाज वाटेल असे नक्कीच करू नका ऍड. मनिष शर्मा साहेब.