नांदेड(प्रतिनिधी)-नोंदणीकृत पदवीधरांचा गट या निर्वाचण गटासाठी गणाकरीता मतदार नोंदणी करण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत वाढ द्यावी अशी मागणी करणारा अर्ज कुलसचिव तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांना प्रा.राजू सोनसळे यांनी दिला आहे.
आपल्या अर्जात विद्यापीठ प्राधिकरण निवडणुक 2022 करीता विविध निर्वाचण गणातून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यासाठी स्वारातीमने नोंदणीकृत पदवीधरांचा गट निवडणूक पहिल्यांदाच संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांसह स्विकृती केंद्रावर सादर करणे अनिर्वाय आहे. या पध्दतीने या निवडणुका होणार आहेत. ग्रामीण भागातील अनेक पदवीधरांना इंटरनेट सुविधा, वीज पुरवठा आणि अन्य अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे स्विकृती केंद्रावर हा अर्ज पोहचण्यात दिरंगाई होत आहे. तरी सर्वबाबींचा नैसर्गिक न्यायाने विचार करून अधिसभा(सिनेट) निवडणूक 2022 साठी नोंदणीकृत पदवीधरांचा गट या निर्वाचन गणाकरीता 15 जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी प्रा.राजू सोनसळे यांनी केली आहे.
