
नांदेड(प्रतिनिधी)-मुळ मानवत येथील एका 17 वर्षीय बालकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आताच कांही वेळापुर्वी उघडकीस आला आहे.
भाग्यनगर रस्त्यावरील उदयनगर येथे साईप्रसाद या इमारतीत मानवत येथील संतोष गंगाधर राऊळ हा युवका किरायाने राहत होता. कांही दिवसांपुर्वी 12 परिक्षेचा निकाल आला होता. तो सुध्दा 12 वीचा विद्यार्थी होता. आज सकाळी तो आपल्या अनेक मित्रांसोबत चहा पिऊन परत आपल्या रुमवर गेला होता. 11 वाजता त्याच्या मित्राने दार वाजवून त्याला आवाज दिला पण त्याने दार उघडले नाही आणि त्यानंतर मित्रांनी खिडकीतून वाकून पाहिल्यावर त्याचा मृतदेह लटकलेला दिसला. संतोष राऊळ या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत होता. याबाबत संतोष राऊळच्या मित्रांनी पोलीसांना माहिती दिली आहे. पोलीसांनी येवून घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्याच्या घरची मंडळी आल्यावर उर्वरीत कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. संतोष राऊळने एसएससी परिक्षेत 94 टक्के गुण प्राप्त केले होते. एचएससी परिक्षेत त्याला 84 टक्के गुण मिळाले होते. आपल्या आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा संतोष आहे. संतोषच्या दोन बहिणी आहेत त्यातील एक बहिण वैद्यकीय शिक्षण घेत आहे.