नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे वारस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या दिवाणी प्रकरणात आता दाखल करणाऱ्या अनिता बियाणीनेच हे प्रकरण चालवायचे नाही अशी पुरसीस दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट तयार झाले आहे. हे प्रकरण तांत्रिक दृष्ट्या आता दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर यांच्या अधिकार क्षेत्रापेक्षा बाहेर गेले आहे.
संजय बियाणी यांच्या मृत्यूनंतर 15 व्या दिवशी अर्थात 20 एप्रिल 2022 रोजी दिवाणी न्यायालय कनिष्ठस्तर नांदेड यांच्या न्यायालयात दिवाणी एम.ए.क्रमांक 736/2022 दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे मुळ वादी अनिता संजय बियाणी, मुलगा राज संजय बियाणी, लग्न झालेल्या दोन मुली पायल मयुर मंत्री आणि नेहा शुभम चिचाणी ह्या आहेत. न्यायालयात हे प्रकरण बियाणी कुटूंबियांच्यावतीने ऍड. पुरूषोत्तम भक्कड यांनी दाखल केले. 21 एप्रिलपासून या प्रकरणाच्या आजपर्यंत 6 तारखा झाल्या. ज्यामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आला होता त्यात दुर्गा संजय बियाणी आणि श्रध्दा संजय बियाणी यांच्या आक्षेपाने. आक्षेपात या दोघांनी आम्ही संजय बालाप्रसाद बियाणी यांचे वारस आहोत असा मजकुर लिहिलेला आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुळ वारसदास ज्यांनी पहिला वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी वाद क्रमांक 736 दाखल केला होता. त्यांनीच हे प्रकरण चालवायचे नाही असा अर्ज दिलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली. या प्रकरणात इतर वकिलांशी चर्चा केली असतांना आता या प्रकरणात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर यांना निर्णय घेता येणार नाही अशा परिस्थितीत आहे असे सांगितले. कारण हे प्रकरण आता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांच्याकडे वर्ग होईल आणि हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय त्यांनाच घेता येईल. अनिता बियाणी आणि इतरांनी हे प्रकरण चालवायचे नाही अशी पुरसीस न्यायालयात का दिली हा या प्रकरणातील मोठा घटनाक्रम आहे. अनिता बियाणी यांनी जरी प्रकरण चालवायचे नाही असे न्यायालयास सांगितले असले तरी दुर्गा संजय बियाणी यांनी आपल्या अर्जात काय सविस्तर माहिती लिहिली आहे हे अद्याप कळलेले नाही. आता कोणी वारसदारच नसेल तर संजय बियाणी यांनी मागे ठेवलेल्या कोट्यावधीच्या संपतीचा आज मालक कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरणात आजचा कोणताही आदेश वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाला नव्हता.