नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदमधील एका महिलेला 1 लाख रुपये खंडणी मागल्याप्रकरणी देगलूर येथील आकाश देशमुखविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकार कायद्याचा दुरपयोग या सदरात हा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा परिषद कार्यालयात काम करणाऱ्या सुरेखा हरिशचंद्र सुरेकर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कामकाजात अनियमितता केल्याने त्यांना नवीन नियुक्ती देण्यात येवू नये अशा पध्दतीची तक्रार आकाश विठ्ठलराव देशमुख (35) रा.संघर्षनगर देगलूर याने दिली होती. दि.27 मे 2022 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद परिसरात त्यांनी सुरेखा सुरेकरकडे ती तक्रार मागे घेण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले तर मी तक्रार मागे घेतो असे आकाश देशमुख म्हणाला. यावरुन वजिराबाद पोलीसांनी आकाश देशमुखविरुध्द गुन्हा क्रमांक 227/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जयश्री गिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
माहिती अधिकार; खंडणी; वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल