नांदेड जिल्हा पोलीस दलातून 4 पोलीस उपनिरिक्षक, 12 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, 7 पोलीस हवालदार आणि एक पोलीस शिपाई यांना सेवानिवृत्तीनंतर सहकुटूंब निरोप
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात आता आपण आपल्या मनाप्रमाणे जगण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीमध्ये कोणी अडचण आणली तर जिल्ह्याचे संपूर्ण पोलीस दल आपल्या मदतीला धावून येईल या शब्दात गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी आपल्या पोलीस दलातील चार पोलीस उपनिरिक्षक, 12 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, 7 पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई आणि एक वरिष्ठ श्रेणी लिपीक यांना सेवानिवृत्तीचा निरोप देतांना सांगितले.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात आज एकूण 25 सेवानिवृत्तांना निरोप देतांना डॉ.अश्र्विनी जगताप म्हणाले की, पोलीस दलात काम करतांना आपल्यावर पुर्वी वरिष्ठांचा दबाव होता आणि आपल्या पेक्षा कनिष्ठ आपल्या आदेशाप्रमाणे काम करणार नाहीत याची भिती होती. आता सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अत्यंत आनंदात आणि आपल्या मनाप्रमाणे जगण्याची संधी आपल्या सर्वांना उपलब्ध झाली आहे. या संधीमध्ये कांही अडचण आली तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण पोलीस दल आपल्या मदतीसाठी सदैव तयार राहील या शब्दांसह डॉ.अश्र्विनी जगताप यांनी आपल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पोलीस कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे हे उपस्थित होते.
आज सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरिक्षक देवराव विठ्ठलराव केदार (पोलीस ठाणे शिवाजीनगर) अब्दुल रब अब्दुल अली शेख(वजिराबाद), गंगाधर विठ्ठलराव लष्करे (पोलीस नियंत्रण कक्ष), नागोराव इरबा रोडे (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग,नांदेड) असे आहेत. सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बाबुराव सासन्ना मुक्तावार, महादु कोंडनबुबा भारती, भास्कर व्यंकटराव कराड (पोलीस मुख्यालय नांदेड), शेख मौलाना शेख हुसेनसाब (शस्त्र विभाग), गौतमसिंघ जससिंघ जत्थेदार(जिल्हा विशेष शाखा), जमीर इरशाद उहुमईखान(पोलीस ठाणे मनाठा), दत्तु बाबासाहेब मुंडे, सुनंदा रेणुकादास विडेकर(पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड), नामदेव लक्ष्मणराव खुने (सिंदखेड), बळीराम शंकरराव मोकमपल्ले (गुरुद्वारा सुरक्षा पथक), दिलीप खोब्राजी सरोदे(पोलीस ठाणे किनवट), संतोष धोंडोपंत जोशी (बिनतारी संदेश विभाग) असे आहेत. आज सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ श्रेणी लिपीक मारोती नारायण धडेकर (पोलीस अधिक्षक कार्यालय) हे आहेत. आज सेवानिवृत्त झालेले पोलीस हवालदार दिगंबर सिताराम पवार (पोलीस ठाणे सिंदखेड), करीम खान मुनीरखान(शहर वाहतुक शाखा), अहमद बेग खदीर बेग (पोलीस ठाणे उमरी), दिलीप उत्तमराव पंडीत(पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण), पांडूरंग मारोतराव रावणपल्ले, किशन संभाजी कदम, मारोती लालू गद्दमवार (पोलीस मुख्यालय नांदेड) असे आहेत. आज सेवानिवृत्त झालेले पोलीस शिपाई बालाजी नागोराव सुरूडवार हे आहेत. या सर्वांना त्यांच्या कुटूंबासह पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावून त्यांचा सहकुटूंब सन्मान करण्यात आला आणि पोलीस दलाने त्यांना निरोप दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार राखी कसबे, रुपा कानगुले यांनी परिश्रम केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले.
सेवानिवृत्तीनंतर मनासारखे जगण्याची संधी-डॉ.अश्र्विनी जगताप