अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 19 वर्षीय युवकाला सात दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-9 वी वर्गात शिकणाऱ्या एका बालिकेवर सतत अन्याय करून एका युवकाने पुढे तिचे लग्न मोडून टाकील, तुझे अनसिन फोटो व्हायरल करील अशा धमक्या दिल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी या युवकाला अटक केली आहे. सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी अल्पवयीन बालिका असतांना अत्याचार करून आता धमक्या देणाऱ्याला सात दिवस अर्थात 8 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आज 19 वर्ष वय असलेल्या बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार ती सन 2018 मध्ये नववी वर्गात शिकत असतांना ज्या गाडीत शाळेत जात होती. त्या गाडीचा चालक गजानन सुर्यकांत वडजे (33) रा.पिंपरण ता.पुर्णा जि.परभणी याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा उचलून त्यांने या अल्पवयीन बालिकेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ढाब्यासमोर शाळेच्या वेळेला डावलून नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा गजानन वडजे वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता.पुढे त्याने बालिकेला ब्लॅकमेल केले. बालिकेने त्याला तिन ग्रॅम सोन्याची अंगठी दिली. आता तिची सोयरीक होत असतांना तुझी सोयरीक मोडतो तुझे फोटो व्हायरल करतो असे सांगून धमक्या दिल्या. या बालिकेने टॉयलेट क्लिनर पिले. सध्या या बालिकेवर उपचार सुरू आहेत.
या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 226/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2) (आय)(एन), 384 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमातील कलम 4 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील हे तपास करीत आहेत. अत्याचार करणारा गजानन सुर्यकांत वडजेला भाग्यनगर पोलीसांनी 1 जुलैच्या रात्री 2 वाजता अटक केली. आज दुपारी न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी या आरोपीला पोलीस कोठडी का आवश्यक आहे याचे सादरीकरण करतांना बालिकेचे फोटो जप्त करणे आहेत. आरोपीकडे व्हिडीओ आहेत काय याची तपासणी करणे आहे. आरोपीकडून सोशल मिडीयाची माहिती घेणे आहे. व्हॅन जप्त करणे आहे, सोन्याची अंगठी जप्त करणे आहे तसेच या गजानन वडजे सोबत कोणी आणखी गुन्हेगार आहेत काय याची माहिती प्राप्त करणे आहे असे सादरीकरण केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी बालिकेवर अत्याचार करणारा गजान सुर्यकांत वडजे यास सात दिवस अर्थात 8 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *