नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, कमल शिंदे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्वच शाखांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित महापुरुष वसंतराव नाईक यांच्या प्रतिमला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. या कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार विनोद भंडारे यांनी उत्तम प्रकारे केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी