नांदेड(प्रतिनिधी)-आमचा बाप डी.वाय.एस.पी. असतो कर्मचाऱ्यांचे बाप आम्ही असतो तेंव्हा काही घडले असेल तर इकडे तिकडे जाण्याऐवजी माझ्याकडे यायला हवे होते. मी त्याचा योग्य इलाज केला असता अशा शब्दात आपल्या विचारांना नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब कोणाला तरी समजून सांगत असल्याचा एक ऑडीओ प्राप्त झाला आहे.
प्राप्त झालेल्या एका ऑडीओ प्रमाणे एका व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब बोलत आहेत. त्यांना तो माणुस सांगत होता. मला खुप त्रास झाला. मी मंथली देण्याबद्दल मला काही त्रास नाही पण जरा जास्तच झाल होत. याचा संदर्भ सांगतांना हा व्यक्ती मागील वर्षाचे एक उदाहरण देतो. गंगाबेट येथे नदीच्या शेजारी अशीच एकदा चणचण झाली होती. त्यावेळेस माझ्यावर कत्ती घेवून धावला होता. या व्यक्तीला अशोकरावजी घोरबांड उत्तर देता की, त्याची लेवल काय तुला माहित नाही काय? मला सांगायला पाहिजे होते मी बाहेर जिल्ह्यात असतांना सुध्दा नांदेडच्या आपल्या माणसांना भरपूर मदत करत होतो. आता मी इथ आलो आहे तेंव्हा तुम्ही आपल्याच माणसाचा मानसन्मान राखत नाहीत असे घोरबांड साहेब सांगतात. मदतीबद्दल बोलतांना श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब अनेकांची नावे घेतात. त्याला विचारतात माझा नंबर आहे काय? तो सांगतो साहेब मी आपल्याला औरंगाबादपासून ओळखतो पण आपला नंबर माझ्याकडे नाही.
मला सांगितल जात तेंव्हा एका मिनिटात मी 50 लाख रुपये पाठवतो आणि एका मिनिटात किडणी मागवतो. अशा प्रकारे मी समाजाची सेवा करत असतांना तु मला त्रास देतोस. आपल्याच माणसांना त्रास द्यायचा नसतो.तुझ्या गाडीचा धंदा हा कायम नाही काल परवाच तुझ्या गाडीने एका लेकराचा मृत्यू झाला याची सुध्दा आठवण घोरबांड साहेब त्याला करून देत होते. तुझे नुकसान करून मला काय फायदा आणि माझे नुकसान करून तुला काय मिळत असा प्रश्न सुध्दा विचारला. गावठाण….. सारखा विचार करू नका विचारवंत ….. सारखे वागा. त्रास होता तर माझ्याकडे यायला पाहिजे होते मी एका मिनिटात त्याची संपूर्ण काही काढून टाकली असती. मी जगाच्या अडचणी सोडवतो तु आपल्याच माणसाला त्रास देतोस या ऑडीओमध्ये श्री.घोरबांड साहेब काही गावांची नावे घेतात आणि या गावातील सोयरपण आमच्या गावात होत नाही असेही सांगत आहेत. आमचा बाप डी.वाय.एस.पी. असतो, कर्मचाऱ्यांचे बाप आम्ही असतो. तेंव्हा पुढे काही गडबड झाली तर माझ्याकडे या शेवटी फोनची रेकॉर्डींग करतोस काय असा प्रश्न घोरबांड साहेब त्या व्यक्तीला विचारतात. असा काही फालतू धंदा करु नका की पी.आय.चा फोन आला वगैरे यावर हे बोलणे संपते.
आमचा बाप डी.वाय.एस.पी.असतो कर्मचाऱ्यांचे बाप आम्ही असतो-इति.श्री.अशोकरावजी घोरबांड