
नांदेड(प्रतिनिधी)-संपुर्ण भारतातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनेने आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्यावतीने 4 जुलै रोजी देशातील प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले. आपल्या मागन्या पुर्ण झाल्या नाही तर 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर, 18 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आणि 2 ऑगस्ट रोजी भारताच्या राजधानी दिल्ली येथील रामलिला मैदानावर धरणे आंदोलन करणार आहोत अशी माहिती महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महामंडळ यांनी दिली आहे.
8 जुन 2022 रोजी ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवीन दिल्ली यांच्यावतीने दिल्ली येथे बैठक संपन्न झाली आणि त्यानुसार आपल्या विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाने आंदोलन करण्याची भुमिका निश्चित केली. त्यानुसार देशाचे नेतृत्व प्रल्हाद जोशी, विश्र्वंभर बसू आणि महाराष्ट्राचे नेतृत्व डी.एम.पाटील यांच्या नेतृत्वात 4 जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र शासनाने कमीशनमध्ये 20 रुपये व विशेष दर्जा प्राप्त राज्यांसाठी 37 रुपये अशी वाढ केलेली आहे. पण ती समाधानकारक नाही. तसेच कोविड कालखंडात संघटनेनी जनतेला धान्य पुरविण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. यामध्ये काही परवानाधारक कोरोनाने मृत्यूमुखी पडले पण त्यांना काहीही मोबदला शासनाने दिलेला नाही. विश्र्व खाद्य कार्यक्रम अंतर्गत त्यांच्या पोर्टलवर 440 रुपये कमीशन प्रतिक्विंटल देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आलेली आहे. पण भारत सरकार त्याबाबत टोलवा टोलवी करत आहे. या कार्यक्रमातर्गत शिफारस केलेले 440 रुपये प्रतिक्विंटल कमिशन किंवा दरमहा 50 हजार रुपये निश्चित मानधन घोषित करावे. फक्त गहू, तांदुळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या पदार्थावर 1 किलो प्रतिक्विंट तुट देण्याच्या विषयावर राज्याने लवकर निर्णय घ्यावा. स्वस्त धान्य दुकानावर गहु, तांदुळ व्यतिरिक्त खाद्य तेल आणि डाळी दरमहा द्याव्यात. केंद्र सरकारने वाढविले 20 व 37 रुपये कमिशनची रक्कम राज्य सरकारने त्वरीत अंमलात आणावी अशा विविध मागण्यासाठी 4 जुलै रोजी नांदेड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून तहसीलदार किरण अंबेकर यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर, कार्याध्यक्ष किशनराव सावंत, ज्येष्ठ जिल्हाउपाध्यक्ष अशोक कापसीकर, जिल्हा महासचिव श्रीदत्त घोडजकर यांच्यासह पी.पी.आरेवार, गणेश पावडे शेख सलीम, साहेबराव नरवाडे, शिवसांब जनकवाडे, बालाजी संगेवार, खिजर अहेमद, एस.एम.सय्यद, निसारोद्दीन गौस, पांडूरंग शेजुळे, हनुमान मुळे, माधव आठवले, प्रकाश इंगोले, साहेबसिंग चंदेल, रोहित जैन, स्वप्नील ढोले, संजय कोल्हे, मधुकर काळे, पंडीत ढोके, शिवाजी कानोटे, प्रकाश नवरे, शिवाजी इंगोले, पी.डी.मस्के यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.