नांदेड(प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील एका व्यक्तीला कमी भावात सोने देतो म्हणून त्याची पाच लाख रुपयांची बॅग किनवट येथील एमआयडीसी परिसरातून पळवून नेण्यात आली आहे.
तेलंगणा राज्यातील आर.रमेश लक्ष्मय्या यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सोमेश्वर ता.बांसवाडा जि.कामारेड्डी येथील रहिवासी आहेत. त्यांना कमी भावात सोने देतो म्हणून किनवट येथे बोलावण्यात आले आणि किनवटच्या कोठारी एमआयडीसी परिसरात 4 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता रमेश देवकर, अजित बेले,विष्णु मेटकर, चंदू बेले आणि रमेश देवकरचा मानलेला भावजी आणि इतर दोन लोकांची नावे माहित नाहीत अशा सर्वांनी त्यांच्याकडून 5 लाख रुपये असलेली बॅग घेतली. त्याबदल्यात सोने मागितले असता कुठचे सोने असे सांगून ते पळून गेले. किनवट पोलीसांनी या बाबत गुन्हा क्रमांक 138/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420,34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्या तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पवार हे करीत आहेत.
कमी किंमतीत सोने देतो पाच लाख रुपयांची रोख रक्कम गायब