नांदेड(प्रतिनिधी)-मार्च 2021 मध्ये गुरूद्वारा येथे गडबड झाली. त्यावेळी कांही पोलीसांना मार लागला होता. या प्रकरणात मे महिन्यात एक नवीन आरोपीचे नाव जोडले गेले. या प्रकरणात त्या आरोपीला पळवून लावले या आरोपाखाली एका सहाय्यक पोलीस निरिक्षक तीन वेतनवाढ बंद आणि एका पोलीस अंमलदाराला एक वेतनवाढ बंद अशा शिक्षा देण्यात आल्या. पण उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमुर्ती एस.जी.मेहारे यांनी त्या आरोपील सशर्त अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. या आदेशात न्यायालयाने हा आरोपी घटना झाली तेंव्हापासून फरार होता. या पोलीसांच्या बाबीला अमान्य केलेले आहे.
दि.29 जून 2021 रोजी गुरूद्वाराजवळ भाविक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. मुळ वाद गुरूद्वाराच्या गेटला कुलूप लावण्याचे होते. कुलूप लावण्याची आयडीया कोणाची होती, कोणी ती अंमलात आणली.याबदल अजूनही स्पष्टता झालेली नाही. घटनाघडल्यावर मात्र सर्व अधिकार पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी आपल्याकडे घेतले आणि या प्रकरणाची हाताळणी केली. या प्रसंगाचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यात 130 दिवस तुरूंगात राहिल्यावर बऱ्याच जणांना नियमित जामीन मंजुर झाला. त्यानंतर काही जणांनी जिल्हा न्यायालयातून आणि काही जणांनी उच्च न्यायालयातून अटकपुर्व जामीन मिळवले.
या घटनेत सर्वात मोठे नाट्य 24 मे ला घडले. त्या दिवशी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात त्यावेळी कार्यरत एका पोलीस अंमलदाराचा जबाब या कागदपत्रामध्ये आहे आणि त्या कागदपत्रानुसार याप्रकरणात रणदिपसिंघ ईश्र्वरसिंघ सरदार उर्फ दिप्पु या युवकाचे नाव जोडले गेले. त्या दिवशी दिप्पुची एक चार चाकी गाडी वजिराबाद पोलीस ठाण्यातच उभी होती. या गाडीचा उपयोग वजिराबादच्या अनेक पोलीसांनी त्याच गुन्ह्यातील आरोपी शोधण्यासाठी केला आहे. त्या अगोदर अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून झाला. त्या खून प्रकरणात काही आरेापींना अटक झाली आणि त्यानंतर 24 मेला रणदिपसिंघ सरदारचे नाव या गुन्ह्यात गोवले गेले.
वजिराबादच्या गुन्हेशोध पथकात त्यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे आणि बरेच पोलीस अंमलदार कार्यरत होते. पण त्यापैकी सोमनाथ शिंदे आणि एक पोलीस अंमलदार संजय जाधव या दोघांनी रणदिपसिंघ सरदारला पळवून लावल्याचा आरोप पोलीसांनीच त्यांच्यावर केला. त्या प्रकरणात शेवट झाला तेंव्हा सोमनाथ शिंदेला अगोदर परभणी येथे पाठविण्यात आले. संजय जाधवला पोलीस मुख्यालयात नियुक्ती देण्यात आली आणि सर्वात शेवटी या प्रकरणावर पुर्ण विराम लागला तेंव्हा सोमनाथ शिंदेला तीन वेतनवाढ बंद आणि संजय जाधवला एक वेतनवाढ बंद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या संदर्भाचे अपील त्यांनी केले आहे की, नाही याची माहिती मिळाली नाही.
हा घटनाक्रम सुरू होता तेंव्हा रणदिपसिंघ सरदारने आपले काही जुने फायनान्स भागिदार आणि अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्याविरुध्द ज्येष्ठ लोकांकडे त्रास देत असल्याबद्दल अर्ज सादर केले. पण काही दिवसानंतर रणदिपसिंघला उपरती झाली आणि त्याने ते अर्ज मागे घेतले. उपरती कशी झाली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. असो पोलीसांच्या प्रक्रियेत अशा उपरत्या अनेकांना होतात.
पण आता आपले नाव त्या गुन्ह्यात आले होते म्हणून रणदिपसिंघ सरदारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 660/2022 दाखल केला. यापुर्वी जिल्हा न्यायालय नांदेडने त्याची ही मागणी फेटाळली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस.जी.मेहारे यांनी रणदिपसिंघ सरदारला 30 जून 2022 रोजी सशर्त अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. त्यामध्ये न्यायालयाने लिहिले आहे की, रणदिपसिंघ घटना घडली तेंव्हापासून फरार होता हे मान्य करता येणार नाही आणि म्हणूनच त्याचा जामीन मंजुर केला. रणदिपसिंघ सरदारने दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 1 या वेळेदरम्यान पोलीस ठाणे वजिराबाद येथे तपासीक अंमलदाराला मदत करण्यासाठी उपस्थित राहायचे आहे. ही अट 27 जुलै 2022 पर्यंत कायम राहणार आहे.
ज्या रणदिपसिंघ सरदारला पळवून लावल्याचा आरोप ज्या पोलीसांवर झाला त्यांना तर शिक्षा मिळाली. पण त्यानंतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला रणदिपसिंघ सरदार सापडला नाही यावर विश्र्वास कसा करावा. त्याचे नाव खुप उशीरा गुन्ह्यात आले ही बाब न्यायालयाने मान्य केली म्हणजे तो पुर्वी पोलीसांच्या संपर्कात होताच. असो रणदिपसिंघ तर अटकपुर्व जामीन घेवून निश्चित झाला मात्र त्याच्या नावामुळे एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार यांचा केसाने गळा कापला असे लिहिले तर चुक ठरणार नाही. उच्च न्यायालयात रणदिपसिंघ सरदारच्यावतीने ऍड. महेश भोसले आणि ऍड. मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी सादरीकरण केले होते.
गुरूद्वारा प्रकरणातील रणदिपसिंघ उर्फ दिप्पुला उच्च न्यायालयाने दिला अटकपुर्व जामीन ; एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार ठरले दोषी