जिल्ह्यात दहा चोऱ्या; तीन लाख 88 हजार 499 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात देगलूर येथे एक जबरी चोरी झाली आहे. त्यात 78 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 हजार 996 रुपयांचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. दत्तनगर भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 45 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समीरा बाग येथे एक घरफोडण्यात आले असून त्यातून 21 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मुदखेड, माहूर आणि किनवट या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यातील एका दुचाकीची किंमत लिहिले नाही. इतर दोन दुचाकींची किंमत 60 हजार रुपये आहे. कासराळी ता.बिलोली येथे एका शेतातून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे दोन बैल आणि एक गोरा चोरीला गेला आहे. नवा मोंढा येथील एसबीआय बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे 44 हजार रुपये चोरण्यात आले आहेत. विश्रामगृह नरसी येथून विद्युत वायर किंमत 4 हजार 500 रुपयांची चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये एकूण 3 लाख 88 हजार 499 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *