नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात विविध संवर्गातील 98 न्यायाधिशांना त्यांना मिळालेल्या बदली जागा बदलून देण्यात आल्या आहेत. त्यातील काही जणांची रॅंक बदली आहे आणि कांही जणांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. उच्च न्यायालय मुंबईचे महाप्रबंधक एन.डब्ल्यू चंदवाणी यांनी हे आदेश 4 जुलै रोजी जारी केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील 3 न्यायाधीशांचा यात समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एम.डब्ल्यू चंदवाणी यांनी जारी केलेल्या बदल्यांच्या आदेशात एकूण 98 न्यायाधीशांची नावे आहेत. नांदेड जिल्ह्यातील चार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. नांदेड येथील तीन जण दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. तर तिघा जणांना बदलून गेलेल्या तीन जणांचा कार्यभार देण्यात आला आहे. नायगाव बाजार येथील अश्विनी पाटील यांना अहमदनगर येथे बदली देण्यात आली आहे. हदगाव येथील एस.आर.पाटील यांना पुणे येथे बदली देण्यात आली आहे. भोकर येथील ए.डी.सुर्यवंशी यांना धरणगाव जि.जळगाव येथे बदली मिळाली आहे. या तिघांच्या जागी नायगाव बाजार येथे असलेले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एन.लोलगे, जी.आर.डोरनापल्ले आणि भोकर येथील डी.डी.माने हे बदलून गेलेल्या लोकांचे अतिरिक्त कार्यभार पाहतील. या बातमीसोबत उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशाची पीडीएफ फाईल जोडली आहे. यात सर्व 98 न्यायाधीशांची नावे आहेत.