कार्यकारी अभियंता पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या डीपीडीसीच्या त्या निर्णयाकडे दुर्लक्ष

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अभय तर मिळत नाही ना?

नांदेड(प्रतिनिधी)-बऱ्याच तक्रारी थेट डिपीडीसीच्या मिटींगमध्ये धडकल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय झाल्यानंतरही त्यांच्यावर मेहरेनजर ठेवत त्यांची अंमलबजावणी होण्यास टाळाटाळ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अभय तर मिळत नाही ना, या बाबत उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग नेहमीच भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या विळख्यात असतो.किती बोगस कामे करून निधी हडप केल्या जातो. याची शेकडो प्रकरणे सातत्याने समोर येत असतात. शासनाच्या तिजारेीवर डल्ला मारण्याचे एक सोप साधन पाणी पुरवठा विभागाकडे पाहिल्या जाते. तसे गंभीर भ्रष्टाचारही अनेकदा उघडकीस आले आहेत. त्याच्या बातम्याही सातत्याने माध्यमामध्ये येत असतात.

या विभागाच्या तक्रारी वाढतच जाऊन चक्क जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. कार्यकारी अभियंता अमोल पाटील यारंच्या कारनाम्याचा पाढा वाचला गेला. त्यांची मनमानी आणि नियबाह्य कामावर चर्चा झाल्यानंतर पालकमंत्र्याच्या उपस्त्तिीत कार्यकारी अभियंता पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. डिपीडीसीच्या निर्णयानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषरदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असते. पण या प्रकरणात मात्र कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. एवढ्या मोठ्या सभागृहात सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय झाल्यावरही जिल्हा परिषछ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल संशय व्यक्त केल्या जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता पाटील यांना अभय तर देत नाहीत ना याबद्दल उलट-सुलट चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *