नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉक्टर्सलेन भागातील गुरू ड्रग हे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातील दोन लाख रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनल रोड येथील एका घरातून 20 हजार रुपयांचा संगणक, 10 हजार रुपये रोख रक्कम आणि 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.बऱ्यामसिंघनगर भागातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. पीपल्स कॉलेज रस्त्यावरून एक दुचाकी चोरीला गेली आहे. मुखेड येथील एका हायवा गाडीमध्ये लावलेल्या 36 हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. तसेच एका शाळेचे बांधकाम सुरू असतांना गोपाळनगर सांगवी भागातून 51 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले आहे.
Related Posts
मुखेड तालुक्यात 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरले; नांदेडच्या बसस्थानकात चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-वर्ताळा ता.मुखेड येथे 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे दोन पशुधन चोरीला गेले आहेत. बसस्थानकातून 27 हजार रुपयांचा ऐवज चोरीला…
अर्धापूर येथे घरफोडून 1 लाखांचा ऐवज लंपास; धावरी ता.लोहा येथे दोन बैल चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-आक्सा कॉलनी अर्धापूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 6 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच मौजे धावरी ता.लोहा येथून…
मुखेड येथे घर फोडून 2 लाख 92 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड शहरात एक लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी चोरी नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज…